भारतात OnePlus Nord सीरीजचे अनेक स्मार्टफोन आहेत. पण आता कंपनी वेअरेबल सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. OnePlus लवकरच OnePlus Nord Watch लाँच करणार आहे. Nord सिरीजमधील हे पहिले स्मार्टवॉच असेल. OnePlus ने त्याचा टीझर देखील जारी केला आहे. मात्र, कंपनीने OnePlus Nord Watch च्या फीचर्सबद्दल संपूर्ण माहिती दिली नाही.
हे सुद्धा वाचा : SAMSUNG चे 10 डिवाइस झाले स्वस्त, सर्वोत्तम पर्याय बघा
टीझरनुसार, वनप्लस नॉर्ड वॉचमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी खास फीचर्स मिळतील. OnePlus Nord Watch सह ब्लॅक स्ट्रॅप उपलब्ध असेल आणि डार्क ग्रे कलरची मेटल फ्रेम असेल. स्मार्टवॉचसोबत एक क्राऊन आणि राउंड डायल मिळेल. कंपनीने अद्याप किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती दिलेली नाही.
OnePlus Nord Watch गोलाकार डायलसह ऑफर केले जाईल. या वर्षी एप्रिलमध्ये वनप्लस वॉच लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1.39-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 454×454 पिक्सेल आहे आणि डिस्प्लेची कॉलिटी AMOLED आहे. डिस्प्लेसह 2.5D कर्व्ड ग्लासचे प्रोटेक्शन आहे.
https://twitter.com/OnePlus_IN/status/1571752762697986048?ref_src=twsrc%5Etfw
तुम्ही तुमच्या OnePlus स्मार्टवॉचच्या जवळपास सर्व सेटिंग्ज तुमच्या स्मार्टवॉचसह बदलू शकाल. तसेच, जर तुमच्याकडे OnePlus टीव्ही असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचने ते बर्याच प्रमाणात नियंत्रित करू शकाल. कंपनीने एका अपडेटद्वारे सांगितले आहे की, यामध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे.
OnePlus Nord Watch ची किंमत 5,000 रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. OnePlus Nord Watch ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये ऑफर केले जाईल. भारतात OnePlus Watch ची किंमत 16,999 रुपये आहे.