तुमचे आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेणार OnePlus चे नवीन स्मार्टवॉच, किंमतही कमी

तुमचे आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेणार OnePlus चे नवीन स्मार्टवॉच, किंमतही कमी
HIGHLIGHTS

OnePlus Nord Watch भारतात लवकरच लाँच होणार

ही वॉच BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वर सूचीबद्ध

आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स उपलब्ध

OnePlus ने मागील वर्षी आपले पहिले स्मार्टवॉच OnePlus Watch लाँच केले होते. आता कंपनी आपले नवीन स्मार्टवॉच आणण्याच्या तयारीत आहे. हे स्मार्टवॉच नॉर्ड सीरिजचे असेल आणि त्याचे नाव OnePlus Nord Watch असेल. भारतीय वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की, वनप्लस नॉर्ड वॉच BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वर सूचीबद्ध केले गेले आहे. 

हे सुद्धा वाचा : Friday Release : जुलैचा शेवटचा शुक्रवार मनोरंजनाने असेल भरपूर, रिलीज होणार मोठे चित्रपट आणि सिरीज

BIS सूचीमध्ये आल्यानंतर, असे म्हणता येईल की OnePlus च्या या नवीन वॉचची लॉन्च डेट फार लांब नाही. फोनच्या लॉन्च डेटबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, यादरम्यान टिपस्टर मुकुल शर्माने फर्स्ट लूकसह काही खास फीचर्स शेअर केले आहेत. ही वॉच अनेक आवश्यक आरोग्य आणि फिटनेस मोडसह येईल. चला तर मग वॉचबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात… 

 OnePlus Nord Watch चे संभावित फीचर्स 

टिपस्टर मुकुल शर्माच्या मते, कंपनी OnePlus Nord Watch मध्ये एक डेडिकेटेड 'N Health' ऍप प्रदान करणार आहे. टिपस्टरने ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये OnePlus ची ही वॉच आयाताकृती डायलसह येईल, असे दिसतेय. कंपनीच्या पहिल्या स्मार्टवॉचचा डायल गोलाकार होता.

 

 

नवीन वॉचमध्ये तुम्हाला राऊंडेड कॉर्नर्ससह मेटल फ्रेम पाहायला मिळेल. याशिवाय वॉचमधील मेनू नेव्हिगेट करण्यासाठी क्राउन बटण देखील देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे वॉचमध्ये कस्टम डायलची सुविधा देखील मिळेल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमध्ये उपस्थित असलेला कोणताही फोटो वॉच फेस म्हणून सेट करू शकतात.

आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी या वॉचमध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाचे फीचर्स देखील मिळतील. यामध्ये, कंपनी SpO2 आणि हार्ट रेट सेन्सरसह स्लीप ट्रॅकिंग देखील ऑफर करणार आहे. यासोबतच आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी अनेक मोड दिले जातील. या उपकरणाच्या किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 5 ते 8 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo