एप्रिलमध्ये OnePlus 10R आणि OnePlus Nord CE 2 Lite लाँच केल्यावर, OnePlus ने OnePlus Nord Buds नावाचे पहिले Nord ब्रँडेड खरे वायरलेस इयरबड्स लाँच केले. तसेच, 2022 मध्ये कंपनी तिसर्या तिमाहीत दोन नवीन इयरबड लाँच करेल, ज्यामध्ये नॉर्ड सीरिज अंतर्गत नवीन इयरबड्सचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी OnePlus Watch आणि OnePlus Band, OnePlus Watch 2 आणि OnePlus Band 2 च्या सक्सेसरवर देखील काम करत आहे.
हे सुद्धा वाचा : स्वस्तात मिळतोय 'हा' Samsung फोन, 64GB व्हेरिएंट ₹749 मध्ये तर 128GB व्हेरिएंट ₹999 मध्ये खरेदी करा
कंपनी नवीन OnePlus Nord earbuds वर काम करत असल्याचे मागील अहवालात समोर आले होते, त्याचवेळी ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन द्वारे त्याची पुष्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता Nord Buds CE ची किंमत, कलर ऑप्शन आणि लाँच टाइमलाइन बद्दल माहिती मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत संपूर्ण माहिती…
OnePlus Nord Buds CE TWS ब्रँडचे आजपर्यंतचे सर्वात परवडणारे इअरबड असतील. Nord Buds CE ची किंमत 1,500 ते 2,000 रुपये असेल. नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus Nord Buds ची किंमत 2,799 रुपये आहे. याशिवाय, हे इयरबड्स मूनलाईट व्हाइट आणि मिस्टी ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असतील. हे किफायतशीर इयरबड्स भारतात यावर्षी जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.
या इअरबड्सच्या फीचर्स आणि सबसिफिकेशन्सबद्दल अद्याप माहिती उघड झालेली नाही. ब्लूटूथ SIG डेटाबेसनुसार, Nord Buds CE चा मॉडेल क्रमांक E506A आहे. हे बड्स वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.2 सह येतील. याशिवाय, वेबसाइटने आगामी ट्रू वायरलेस बड्सबद्दल फार काही उघड केले नाही.