Nothing Watch Pro आणि Buds Pro फक्त 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Launch, काय मिळेल खास? Tech News 

Nothing Watch Pro आणि Buds Pro फक्त 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Launch, काय मिळेल खास? Tech News 
HIGHLIGHTS

CMF by Nothing ने भारतात अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत.

यामध्ये Watch Pro, Buds Pro आणि ऍडॉप्टरचा समावेश आहे.

लोकप्रिय कंपनीने ही सर्व प्रोडक्ट्स 5,000 रुपयांच्या आत लाँच केली आहेत.

CMF by Nothing ने भारतात अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये Watch Pro, Buds Pro आणि ऍडॉप्टरचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सर्व नथिंग प्रोडक्ट्स 5,000 रुपयांच्या आत आहेत. लोकप्रिय कंपनीने नथिंग वॉच आणि वायरलेस इयरफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग वेळ न घालवता बघुयात या उपकरणांची किंमत आणि इतर सर्व तपशील.

CMF by Nothing Watch Pro ची किंमत 

CMF by Nothing watch pro

CMF by Nothing Watch Pro ची किंमत 4,499 रुपये आहे. ही वॉच फ्लिपकार्टवरून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या ही वॉच साईटवर ‘Coming Soon’ सह आहे. त्याबरोबरच, ही वॉच तुम्हाला डार्क ग्रे आणि ऑरेंज कलरमध्ये खरेदी करता येईल. 

Nothing Watch Pro 

यात एक स्क्वेअर डायल आहे जो, अल्युमिनियम अलॉयच्या फ्रेमसह येतो. यात 1.96 इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 50Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीने IP68 रेटिंग दिले आहे, ज्यासह ही वॉच पाणी आणि डस्ट प्रतिरोधक आहे. यात ऑल्वेज ऑन डिस्प्ले मिळणार आहेत, ज्यात 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत. हेल्थ आणि फिटनेससाठी 110 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर इ. मिळतील. तसेच, यामध्ये स्मार्ट नोटिफिकेशन्स, वेदर अपडेट फीचर, रिमोट कंट्रोल इ. फीचर्स देखील मिळतील. डिवाइसमध्ये 330 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

CMF by nothing buds pro

Nothing Buds Pro

Nothing Buds Pro ची किंमत केवळ 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे TWS इयरफोन्स ANC सह येतात. या बड्सची चार्जिंग केस 460mAh बॅटरीसह येते. त्याबरोबरच, प्रत्येक इयरबड 55mAh बॅटरीसह येतो, त्यासह फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. यात 10mm डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप आहे. तसेच, 3HD माइक आहेत. यात 45dB अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, क्लिअर कॉल अल्गोरिदम आणि अँटी-विंड नॉइज सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo