Amazing! ट्रान्सपरंट डिझाइनसह Nothing Ear आणि Ear (a) भारतात लाँच, ChatGPT चा देखील मिळेल ऍक्सेस। Tech News
कंपनीने नव्या आकर्षक ट्रान्सपरंट डिझाईनसह Nothing Ear आणि Ear (a) भारतात लाँच
Nothing Ear हे ऑडिओ विभागातील एक प्रीमियम मॉडेल आहे.
या दोन्ही बड्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.
ट्रान्स्परंट डिझाईनसह स्मार्टफोन्स बनवणारी कंपनी Nothing ने नवीन इअरबड्स सादर केले आहेत. होय, कंपनीने नव्या आकर्षक ट्रान्सपरंट डिझाईनसह Nothing Ear आणि Ear (a) भारतात लाँच केले. ही कंपनीची नवीनतम ऑडिओ प्रोडक्ट्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Nothing Ear हे ऑडिओ विभागातील एक प्रीमियम मॉडेल आहे, तर Ear (a) एक परवडणारे मॉडेल आहे. हाय-रेस वायरलेस ऑडिओ फीचर दोन्ही मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन ANC चा देखील सपोर्ट देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Nothing Ear आणि Ear (a) ची किंमत आणि तपशील बघुयात-
हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! नवा Realme C65 5G ची लवकरच भारतात होणार दाखल, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News
Nothing Ear and Ear (a) ची भारतीय किंमत
Nothing ने नवे Nothing Ear डिवाइस 11,999 रुपयांच्या किंमतीत सादर केले आहे. तर दुसरीकडे, नथिंग Ear (a) मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. हे दोन्ही बड्स तुम्हाला ब्लॅक, येलो आणि व्हाईट या कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येतील.
Nothing Ear
नथिंगच्या नवीन बड्सबद्दल सांगायचे झाल्यास, या बड्समध्ये पारदर्शक डिझाइन आणि सिलिकॉन इअर टीप आहे. दोन्ही मॉडेल्सचा व्हाईट व्हेरिएंट ड्युअल-टोन लुकसह येतो. नथिंग इअरमध्ये नवीन कस्टम सिरेमिक 11 मिमी ड्रायव्हर्स आहेत. हे बड्स उत्कृष्ट आवाज आणि बास देतात, असा कंपनीचा दावा आहे. त्याबोरबरच, यात 45dB सक्रिय नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, नथिंग इअर एका चार्जवर 8.5 तास टिकेल. तसेच, इअर बड चार्जिंग केससह 40.5 तास टिकतात.
Nothing Ear (a)
Nothing Ear (a) मध्ये 11mm PMI + TPU डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. हाय-रेस वायरलेस ऑडिओ फीचर दोन्ही मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. याला पाण्याच्या संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. या बड्समध्ये ChatGPT चा ऍक्सेस देखील आहे, जो व्हॉइस कमांडवर वापरला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.4 सपोर्ट आहे. याशिवाय, यात ड्युअल डिव्हाइस कनेक्शन फीचर्स आहे, जे वापरकर्त्यांना एकाच वेळी दोन उपकरणांशी कनेक्टिव्हिटी प्रदान करते. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, ANC डिसेबल झाल्यानंतर 9.5 तास टिकते. तर, Ear (a) एका चार्जिंगवर 42.5 तास टिकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही बड्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. या दोन्ही उपकरणांमध्ये इन-इअर डिटेक्शन, गुगल फास्ट पेअर, फाइंड माय इअरबड्स फीचर्सही देण्यात आले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile