Noise कंपनीचे प्रोडक्ट्स भारतीय ग्राहकांमध्ये वेअरेबल्ससाठी प्रसिद्ध आहेत. कंपनी स्टायलिश लुकसह स्मार्टवॉच तयार करते. अशातच कंपनीने आता अजून एक नवी स्मार्टवॉच लाँच केली आहे. या स्मार्टवॉचचे नाव NoiseFit Force Plus असे आहे. हे एक रफ डिझाईनसह येणारी स्मार्टवॉच आहे. बघुयात या स्मार्टवॉचची किंमत, फीचर्स आणि उपलब्धता –
रफ डिझाईन म्हणजेच हे स्मार्टवॉच ट्रॅकिंग किंवा सायकलिंग करताना वापरता येणार आहे. तरीही, स्मार्टवॉच लवकर झिजणार नाही. ही वॉच ढोबळ वापरासाठी बनवली गेली आहे. घड्याळात शॉर्टकट बटण देखील आहे, यासह तुम्ही थेट स्पोर्ट मोडवर जाऊ शकता. स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत 3,999 रुपये आहे. ही वॉच कंपनीच्या अधिकृत साइट आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टवॉच जेट ब्लॅक, मिस्ट ग्रे आणि टील ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.
वॉचमध्ये 1.46 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऍडव्हान्स कॉलिंग फीचर आहे. यामध्ये स्मार्टवॉचमध्ये सिंगल चिप देण्यात आली आहे. तसेच, ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी ऑफर केली जात आहे. ज्याच्या मदतीने फोन सहज पेअर होणार आहे.
एवढेच नाही तर, ही वॉच सिंगल चार्जवर तब्बल 7 दिवसांची बॅटरी लाईफ देते. त्यासोबतच, IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट समर्थनासह येईल. वॉचमध्ये 10 संपर्कांना ब्लूटूथ कॉलिंगने जोडण्याची सुविधा दिली जात आहे.
आरोग्य फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हे वॉच हृदय गती मॉनिटर, SpO2, स्लीप ट्रॅक, तणाव, मासिक पाळी ट्रॅकिंग देते. यामध्ये 130 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच 100 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत.