Noiseकडून उत्कृष्ट स्मार्ट चष्मा लाँच, कॉलिंगसह मिळेल दमदार म्युझिकचा आनंद आणि बरंच काही

Noiseकडून उत्कृष्ट स्मार्ट चष्मा लाँच, कॉलिंगसह मिळेल दमदार म्युझिकचा आनंद आणि बरंच काही
HIGHLIGHTS

Noiseकडून आयवेअर नॉइज i1 लाँच

या नवीनतम गॅजेटची किंमत 5,999 रुपये

कॉलिंग फिचरसह मिळेल उत्तम संगीत अनुभव

आपल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत, भारतीय ऑडिओ आणि वेअरेबल उत्पादक Noise ने पहिले स्मार्ट आयवेअर i1 लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, नॉईज लॅबमध्ये बनवलेल्या या स्मार्ट ग्लासेसमध्ये यूजर्सना ऑडिओचा उत्तम अनुभव मिळतो. Noise च्या या नवीनतम गॅजेटची किंमत 5,999 रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची विक्री सुरू झाली आहे. ब्लूटूथद्वारे तुमच्या स्मार्टफोनशी Noise i1 कनेक्ट करून, तुम्हाला तुमच्या आवडत्या म्युझिकचा आनंद घेता येईल. त्याबरोबरच, यामध्ये कॉलिंग फिचर देखील मिळेल.   

हे सुद्धा वाचा : 9.7-इंच डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 वर आधारित असेल Motorola Moto Tab G62, लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक 

noise smart glass

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनी या स्मार्ट आयवेअरमध्ये टच कंट्रोल्स देत आहे, जेणेकरून युजरला संगीत प्ले आणि पॉज करण्यात अडचण येऊ नये. यासोबतच टच कंट्रोल फीचरच्या मदतीने युजर्स कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्‍ट करू शकतात. याशिवाय तुम्हाला फोनचा व्हॉईस असिस्टंट देखील त्यात दिलेल्या टच कंट्रोलसह ऍक्टिव्ह करता येईल.  

noise smartglass

 हे स्मार्ट आयवेअर अँड्रॉइड तसेच iOS डिव्‍हाइसेससह पेयर होईल. चष्म्याची खास गोष्ट म्हणजे वापरकर्ते त्यामध्ये स्वतःचे पॉवर लेन्स देखील बसवू शकतात. यामध्ये दिलेली बॅटरी उत्कृष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, हे डिवाइस  एका फुल चार्जवर 9 तासांपर्यंत म्युझिक स्ट्रीमिंग देते.

i1 की बद्दल कंपनीने सांगितले की, जर ते 15 मिनिटांसाठी चार्ज केले तर त्यात 2 तास आरामात म्युझिक ऐकता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी यामध्ये ब्लूटूथ 5.1 देत आहे. जर आपण आयवेअरमध्ये असलेल्या स्टॉक ग्लासेसबद्दल बोलायचे झाल्यास ते खूपच उत्कृष्ट आणि आकर्षक आहेत. हे डिवाइस तुमच्या डोळ्यांचे UV RAYS  पासून संरक्षण करेल. यासह, ते ब्लु लाईटचा प्रभाव देखील लक्षणीयरीत्या कमी करतात. IX4 रेटिंगसह येणारे, हे आयवेअर वॉटर आणि स्प्लॅश रेजिस्टंट आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo