ब्लूटूथ कॉलिंग आणि हार्ट रेट सेन्सरसह Noiseची उत्कृष्ट स्मार्टवॉच लाँच, लाँच ऑफरमध्ये 50% सूट

ब्लूटूथ कॉलिंग आणि हार्ट रेट सेन्सरसह Noiseची उत्कृष्ट स्मार्टवॉच लाँच, लाँच ऑफरमध्ये 50% सूट
HIGHLIGHTS

Noise चे नवीन स्मार्टवॉच ColorFit Pulse Buzz भारतात लाँच

स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये

वॉचमध्ये रनिंग, सायकलिंग आणि इनडोअर स्पोर्ट्ससह 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स उपलब्ध

आपल्या स्मार्टवॉचेसची रेंज वाढवत Noise ने भारतात Noise ColorFit Pulse Buzz लाँच केले आहे. कलर्ड आणि टचस्क्रीन डिस्प्लेसह येत असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे कंपनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही वॉच इंट्रोडक्टरी ऑफरसह खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ऑफर अंतर्गत, ही वॉच तुमच्यासाठी केवळ 2,499 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त, तुम्ही Amazon India वरून Noise ColorFit Pulse Buzz स्मार्टवॉच खरेदी करू शकता. या उपकरणाची विक्री 8 जूनपासून सुरू होणार आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स… 

हे सुद्धा  वाचा : आधार कार्ड-पॅन कार्ड आताच करा लिंक, अन्यथा दुप्पट दंड आकारण्यात येईल

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Noise ColorFit Pulse Buzz मध्ये 1.69-इंच लांबीचा TFT LCD डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये, मेनू ऍक्सेस आणि UI नेव्हिगेशनसाठी साईड बटण देण्यात आले आहे. कंपनी या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक फीचर्स देत आहे. यामध्ये 24×7 हार्ट रेट सेन्सरसह ब्लड ऑक्सिजन लेवल जाणून घेण्यासाठी SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लिप ट्रॅकरदेखील आहे.   

या व्यतिरिक्त, तुम्हाला वॉचमध्ये रनिंग, सायकलिंग आणि इनडोअर स्पोर्ट्ससह 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स मिळतील. कंपनीने या वॉचमध्ये बिल्ट-इन माइक आणि स्पीकर देत आहे. या स्मार्टवॉचची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही ब्लूटूथ कॉलिंगचाही आनंद घेऊ शकता. वॉचची ब्लूटूथ रेंज 10 मीटर पर्यंत आहे. यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट्स आणि नंबरपॅडही बघायला मिळेल.

या व्यतिरिक्त, वॉचच्या बॅटरी लाइफबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नॉईज कलरफिट पल्स बझ जेट ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू, ऑलिव्ह ग्रीन, शॅम्पेन ग्रे आणि रोझ पिंक या 5 कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo