Noise ने भारतात आपली नवीन Noise ColorFit Pro 5 स्मार्टवॉच सीरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने 2 मॉडेल्स सादर केले आहेत. होय, या सीरिजमध्ये स्टँडर्ड Noise ColorFit Pro 5 आणि Noise ColorFit Pro 5 Max प्रीमियम मॉडेल देखील आहे. ही वॉच नॉईज कलरफिट प्रो 4 सिरीजच्या नेक्स्ट जनरेशनच्या रूपात सादर करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टवॉच सिरीजची किंमत आणि सर्व तपशील.
हे सुद्धा वाचा: Upcoming Smartphones December 2023: पुढील महिन्यात लाँच होणार OnePlus, Honor इ. टॉप ब्रँड्सचे जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी
Noise ColorFit Pro 5 ची सुरुवातीची किंमत 3,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर, Noise ColorFit Pro 5 Max चा बेस वेरिएंट 4,999 रुपयांना उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, कंपनीने एलिट एडिशन देखील सादर केले आहेत, जे अनुक्रमे 4999 रुपये आणि 5999 रुपये किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असतील. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही वॉच GoNoise.com व्यतिरिक्त Flipkart, Amazon India, Myntra आणि देशभरातील कोणत्याही अधिकृत रिटेलरकडून खरेदी करता येईल.
Noise ColorFit Pro5 सिरीज 1.85-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येते. त्याबरोबरच, मॅक्स व्हेरिएंटमध्ये थोडा मोठा म्हणजे 1.96-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्ले आहे. ही स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येते, म्हणजेच ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक देखील आहे. यात तुम्हाला Noise Health Suite फिचर देखील मिळेल. या फीचरद्वारे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष ठेवता येईल.
होय, तुम्ही तुमच्या हृदयाच्या गतीवर लक्ष ठेवू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमची SpO2 लेव्हल देखील तपासू शकता. याशिवाय 100 स्पोर्ट्स मोड आणि 150 पेक्षा जास्त वॉच फेस ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिवाइसच्या बॅटरी लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, ही वॉच एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते. याशिवाय, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइसमध्ये SOS आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी देखील आहे.