तुमच्या बजेट किमतीत Noise ची नवी स्मार्टवॉच लाँच, उपकरण आरोग्यासाठी ठरेल बेस्ट

तुमच्या बजेट किमतीत Noise ची नवी स्मार्टवॉच लाँच, उपकरण आरोग्यासाठी ठरेल बेस्ट
HIGHLIGHTS

Noise ColorFit Icon 3 बजेट स्मार्टवॉच अखेर भारतात लाँच

स्मार्टवॉच प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणाऱ्या दरात लाँच

सिंगल चार्जवर ही बॅटरी सात दिवस चालेल,

लोकप्रिय स्मार्टवॉच ब्रँड Noise ने Noise ColorFit Icon 3 बजेट स्मार्टवॉच अखेर भारतात लाँच करण्यात आले आहे. तरुणाईला आजकाल त्यांच्या स्मार्टवॉचसह स्टायलिश लुक करण्याचे क्रेझ आहे. अशात, कंपनीचे हे स्मार्टवॉच त्यांच्या जबरदस्त स्पोर्ट्स, हेल्थ आणि फिटनेस फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे. तसेच, हे स्मार्टवॉच प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणाऱ्या दरात लाँच झाले आहे. 

Noise ColorFit Icon 3 ची किंमत 

Noise ColorFit Icon 3 स्मार्टवॉचची किमंत 1,999 रुपये आहे. ही वॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते. ही स्मार्टवॉच मॅट गोल्ड, रोज पॉव्ह, स्पेस ब्लु, मिडनाईट गोल्ड आणि जेट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केले गेले आहे. 

Noise ColorFit Icon 3 स्पेसिफिकेशन्स 

Noise ColorFit Icon 3 स्मार्टवॉचमध्ये 1.91 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये मॅसी आणि गोल्ड फिनिशसह मेटल बिल्ड मिळतो. यामध्ये नेव्हिगेशनसाठी क्राऊन बटनदेखील देण्यात आला आहे. तसेच, तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. वॉटर रेसिस्टन्टसाठी यामध्ये IP67 रेटिंग देण्यात आली आहे.

हेल्थ आणि फिटनेसबद्दल बोलायचे झाल्यास ही वॉच यासाठी उत्तम आहे. यासोबत नॉइज हेल्थ सूटचा सपोर्ट दिला गेला आहे. हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंगसाठी SpO2, स्लिप, स्ट्रेस, ब्रीद, प्रॅक्टिस आणि फिमेल सायकल ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतात.  

याव्यक्तिरिक्त, यामध्ये 100 स्पोर्ट्स मोड दिले गेले आहेत. ही वॉच स्विमिंग दरम्यान देखील घालता येईल. विशेष म्हणजे या वॉचमध्ये व्यवहारासाठी  QR कोड स्कॅनिंगची देखील सुविधा आहे. उपकरणात 240 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर ही बॅटरी सात दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo