ह्यात 1.37 इंचाची डिस्प्ले, 1.2GHz स्नॅपड्रॅगन 400 क्वाड-कोर प्रोसेसर, 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 360x325 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 263ppi आहे.
मोटोरोलाने भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टवॉच मोटो 360 स्पोर्ट लाँच केला आहे. हा डिवाइस ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हे स्मार्टवॉच १९,९९९ रुपयात खरेदी करु शकात. हा केवळ काळ्या रंगात उपलब्ध आहे. ह्या डिवाइसचे नावाशी स्पोर्ट जोडलेले आहे, ह्याचाच अर्थ असा की, कंपनीने ह्या डिवाइसला खेळाची आवड असलेल्या लोकांना आणि अॅथलिट्संना डोळ्यासमोर ठेवून बनवले गेले आहे.
ह्या डिवाइसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक बिल्ट-इन GPS आहे. ह्यात 1.37 इंचाची डिस्प्ले, 1.2GHz स्नॅपड्रॅगन 400 क्वाड-कोर प्रोसेसर, 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 360×325 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 263ppi आहे. ह्या डिवाइसला आपण सहजपणे स्मार्टफोनशी जो़डू शकतो. ह्यात ब्लूटुथ आणि वायफायसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.