मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपले स्मार्टवॉच 360 च्या सेकेंड जेनरेश व्हर्जनला भारतात लाँच केले आहे. कंपनीने ह्या डिवाइसची किंमत १९,९९९ रुपये ठेवली आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टवॉच फ्लिपकार्टच्या आणि मिंत्राच्या माध्यमातून आज रात्री १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मोटोरोलाने IFA 2015 दरम्यान आपले स्मार्टवॉच मोटो ३६० च्या नवीन संस्करणाचे प्रदर्शन केले होते. कंपनीने एकाच वेळी दोन मॉडेल प्रदर्शित केले होते, ज्यात एक मॉडल 46mm आकाराचा आणि दुसरा 42mm आकाराचा होता.
मोटो 360 स्मार्टवॉचचा आकार गोल आहे आणि ह्यात एक लॉक बटन दिले गेले आहे. त्याचबरोबर हे स्मार्टवॉच बरेच चांगले प्रीमियम लुक देतो. पहिली पिढीच्या मोटो 360 स्मार्टवॉचमध्ये लॉक बटन 3 ओ क्लॉकच्या पोजिशनवर दिले गेले होते, तर नवीन पिढीच्या स्मार्टवॉचमध्ये हे २ ओ क्लॉकच्या जागेवर दिले गेले आहे. स्मार्टवॉचमध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास स्क्रॅच प्रोटेक्शन एयरक्राफ्ट-ग्रेड स्टील केसिंग आणि IP67 वॉटर रेजिस्टेंस सारखी वैशिष्ट्ये आहेत. हे स्मार्टवॉच महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रंगात बनवले आहेत. महिलांसाठी गोल्ड केसिंगसह पीच-फिनिश बेजेलचा उपयोग केला गेला आहे, तर पुरुषांसाठी ब्लॅक केसिंगचे स्मार्टवॉच बनवले आहे. ह्या स्मार्टवॉचच्या नवीन व्हर्जनला लेदर बँड आणि मेटल बँडचा पर्याय दिला आहे.
लूक आणि आकार सोडला तरी इतर सर्व फीचर्स सारखीच आहेत. दोघांमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर, 4GB चे अंतर्गत स्टोरेज आणि 512MB ची रॅम दिली गेली आहे. दोन्ही प्रकारात ब्लूटुथ v4.0 LE आणि वायफायी सुविधा दिली गेली आहे. मोटो 360मध्ये जो सेंसर दिला गेला आहे, त्यात ऑप्टिकल हार्ट रेट मॉनिटर, एक्सलेरोमीटर, एबियन्स सेंसर, वायब्रेशन मोटर आणि हप्टिक फीडबॅक यांचा समावेश आहे. ह्यात लाइव डायल फीचर दिले गेले आहे. ह्यात 42mm प्रकारात 1.37”, 360x325px डिस्प्ले आणि ३००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तर ह्याच्या 46mm प्रकारात 1.56”, 360x330px डिस्प्ले आणि ४००mAhची बॅटरी दिली गेली आहे.