Xiaomi ने आपल्या इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर अनेक प्रोडक्ट लाँच केली आहेत. या कार्यक्रमात फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Xiaomi 12S देखील सादर करण्यात आला. या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले. याशिवाय Xiaomi Mi Band 7 Pro देखील लॉन्च करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Xiaomi चा दमदार फोन लाँच, मिळेल 50 + 50MP रियर कॅमेरा, जाणून घ्या किंमत
नवीन Xiaomi Mi Smart Band 7 Pro बँड सध्या चीनमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. या बँडची विक्री चीनमध्ये 7 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याची किंमत CNY399 म्हणजेच 4,700 रुपये ठेवण्यात आली आहे. Xiaomi ने CNY 379 च्या प्रास्ताविक किमतीत हा स्मार्ट बँड लॉन्च केला आहे.
Xiaomi Mi Smart Band 7 Pro मध्ये 1.64-इंच स्क्रीन आहे. हा डिस्प्ले आयताकृती स्वरूपात दिला आहे. Mi Band 7 Pro मध्ये स्क्रीन टू बॉडी रेशो 70 % आहे. त्याची पिक्सेल डेन्सिटी 326ppi आहे. यामध्ये मेटल फ्रेम डिस्प्लेच्या सभोवताली देण्यात आली आहे.
याशिवाय, यामध्ये Xiaomi 5ATM चा वॉटर रेझिस्टन्स देखील देत आहे. यामध्ये मोठे अपडेट म्हणजे GPS सपोर्ट आहे. याच्या मदतीने रनिंग आणि इतर ऍक्टिव्हिटीजदरम्यान अचूक लोकेशन ट्रॅक करता येते. या बँडमध्ये NFC सपोर्टही दिला जातो.
कंपनीने म्हटले आहे की, बँडची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 12 तास टिकू शकते. कंपनी लवकरच भारतातही हे उपकरण सादर करू शकते. मात्र,कंपनीने भारतातील लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
या बँड व्यतिरिक्त, Xiaomi ने Xiaomi 12S Ultra, Xiaomi 12S Pro आणि Xiaomi 12S हे स्मार्टफोन देखील सादर केले. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर तिन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. कंपनीने Xiaomi Book Pro 2022 सिरीज देखील लाँच केली आहे.