तरुणाईसाठी बजेट सेगमेंटमध्ये आता आणखी एक स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आली आहे. Maxima Max Pro Knight+ असे या नव्या बजेट स्मार्टवॉचचे नाव आहे. या वॉचसह तुम्हाला आकर्षक आणि क्लासिक लुक मिळणार आहे. म्हणजेच या वॉचसह 1.39 इंच लांबीचा राउंड टच डिस्प्ले देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टवॉचची किंमत आणि इतर फीचर्स –
Maxima Max Pro Knight+ ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही वॉच लेदर स्ट्रॅपसह देखील उपलब्ध असणार आहे. Maxima Max Pro Knight+ मध्ये HD डिस्प्ले आहे. यात स्पेस ब्लॅक, रोझ गोल्ड ब्लॅक आणि सिल्व्हर ग्रे कलर ऑप्शन्स आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, या वॉचसह 1.39 इंच लांबीचा राउंड टच डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचसह ब्लूटूथ कॉलिंग देखील देण्यात आले आहे. यात Realtek चा चिपसेट मिळणार आहे. त्याबरोबरच, वॉचसह 100+ स्पोर्ट्स मोड देखील आहेत.
मनोरंजनासाठी यात इनबिल्ट गेम्स देखील आहेत. Maxima Max Pro Knight + सह HD स्पीकर आणि मायक्रोफोन उपलब्ध आहेत. यात वॉटर रेझिस्टंटसाठी IP67 रेटिंग मिळाले आहे. हार्ट रेट, SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग हे हेल्थ फीचर्स वॉचसह उपलब्ध आहेत.
Maxima Max Pro Knight+ मध्ये AI व्हॉईस असिस्टंटचे समर्थन आहे. याद्वारे फोनचा कॅमेरा देखील नियंत्रित करता येईल. त्याबरोबरच, वॉचमध्ये अलार्म आणि पीरियड ट्रॅकिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत.