लेटेस्ट Redmi Watch 5 Lite स्मार्टवॉच भारतात लाँच! एका चार्जवर चालेल तब्बल 18 दिवस, पहा किंमत
Redmi ने आपली नवी Redmi Watch 5 Lite स्मार्टवॉच भारतात लाँच केली.
पहिल्या सेलदरम्यान तुम्ही ही वॉच 3,499 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल.
तुम्ही तुमच्या आवाजाने Alexa सपोर्टसह ही वॉच कंट्रोल करू शकता.
Redmi Watch 5 Lite: प्रसिद्ध टेक कंपनी Redmi ने आपली नवी Redmi Watch 5 Lite स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. ही वॉच Redmi Watch 5 चे नवीन मॉडेल आहे, जे मागील महिन्यात ऑगस्टमध्ये लाँच केले गेले होते. फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी यात अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टही आहे. क्लिअर कॉलिंग अनुभवासाठी घड्याळात ENC सपोर्ट देखील मिळेल. जाणून घेऊयात Redmi Watch 5 Lite ची किंमत आणि फीचर्सशी संबंधित संपूर्ण माहिती-
Also Read: Vivo V40e 5G: बहुप्रतीक्षित फोन 50MP सेल्फी कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स
Redmi Watch 5 Lite ची किंमत
Shine brighter with the AMOLED display on the all-new #RedmiWatch5Lite!
— Redmi India (@RedmiIndia) September 25, 2024
Whether you're exploring or working out, it's the perfect companion for all your adventures.
The sale goes live on September 26, 2024 | 12 PM.
Stay tuned: https://t.co/0YbW07m4iP#MakeYourMove pic.twitter.com/MjNTS4MMOo
Redmi ने Redmi Watch 5 Lite स्मार्टवॉच 3,999 रुपये या किमतीत सादर केली आहे. ही स्मार्टवॉच ब्लॅक आणि लाईट गोल्डन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची विक्री उद्या म्हणेजच 26 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्ही ही वॉच 3,499 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल.
Redmi Watch 5 Lite चे स्पेसिफिकेशन्स
नवीनतम Redmi Watch 5 Lite मध्ये 1.96 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 410 x 502 पिक्सेल आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या वॉचमध्ये 200 पेक्षा जास्त वॉच फेसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी 50 पेक्षा जास्त फेसेस कस्टमाइज केले जाऊ शकतात. पाण्यापासून बचाव करण्यासाठी यात 5ATM सपोर्ट देण्यात आला आहे, यासह ही वॉच 50 मीटर पाण्यातही कार्य करेल. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यासाठी यात बिल्ट-इन मायक्रोफोन आहे.
तुम्ही तुमच्या आवाजाने Alexa सपोर्टसह ही वॉच कंट्रोल करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये 470mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही वॉच सिंगल चार्जवर 18 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देईल, असा दावा कंपनीने केला आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या आरोग्यासाठी यात 24×7 आरोग्य निरीक्षण प्रणाली आहे. फिटनेससाठी, या वॉचमध्ये 160 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile