Google Pixel Watch: उत्तम डिस्प्ले आणि अनेक आरोग्य फीचर्ससह लाँच, किंमत जाणून घ्या
Google कडून Google Pixel Watch लाँच
Google Pixel वॉचची किंमत जवळपास 28,700 रुपये
Google Pixel Watch सह 24 तासांची बॅटरी लाइफ उपलब्ध
Google ने या वर्षी आपल्या मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये Google Pixel Watch लाँच केले आहे. वॉचसोबतच कंपनीने Pixel टॅब्लेट सोबत Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन देखील लाँच केले आहेत. गुगल पिक्सेल वॉच स्लिम बेझल आणि 1.6-इंच लांबीच्या राउंड OLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. 1,000 nits चा पीक ब्राइटनेस आणि ऑल्वेज ऑन डिस्प्लेसाठी सपोर्ट वॉचसोबत उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! 50MP कॅमेरासह Moto चा नवीन जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमतही कमी
Google Pixel Watch चे स्पेसिफिकेशन्स
Google Pixel Watch मध्ये बेझल-लेस सर्क्युलर डायल आहे. वॉचमध्ये 1.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 1,000 nits ब्राइटनेस, 320ppi आणि ऑल्वेज ऑन डिस्प्ले सपोर्ट आहे. डिस्प्ले 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. या वॉचमध्ये Exynos 9110 प्रोसेसर कॉर्टेक्स M33 coprocessor आणि 2 GB RAM सह समर्थित आहे. ही वॉच क्वाड पेअरिंग फिचर आणि ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) ट्रॅकिंगसह येते.
Google Pixel Watch ला नवीनतम Wear OS 3.5 मिळतो, जो Fitbit च्या आरोग्य आणि फिटनेस फीचर्ससह Google सहाय्यक सपोर्टसह येतो. तसेच, वॉचमध्ये NFC सपोर्ट, गुगल वॉलेट आणि गुगल मॅप्स इनबिल्ट GPS सपोर्ट आहे. Google Pixel Watch सह 24 तासांची बॅटरी लाइफ उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, वॉच ब्लूटूथ v5.0, 2.4GHz Wi-Fi, 4G LTE आणि NFC चे समर्थन करते. वॉटर रेझिस्टंटसाठी, वॉचला 5ATM रेटिंग मिळाले आहे.
Google Pixel वॉचची किंमत
गुगल पिक्सेल वॉचच्या Wi -Fi व्हेरिएंटची किंमत $349.99 म्हणजेच जवळपास 28,700 रुपये आणि LTE व्हेरिएंटची किंमत $399.99 म्हणजेच सुमारे 32,800 रुपये होती. गुगल पिक्सेल वॉचचे वाय फाय व्हेरियंट ऑब्सिडियन, हेझेल आणि चॉक कलर या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे. तर LTE व्हेरिएंट ऑब्सिडियन, हेझेल आणि चारकोल कलरमध्ये उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile