Apple ने आपल्या Apple Glowtime Event 2024 या इव्हेंटदरम्यान आपले लेटेस्ट Apple Watch 10 सीरीज सादर केली आहे. तर, कंपनीने Watch Ultra 2 जबरदस्त अपग्रेडसह दाखल केले आहे. त्याबरोबरच, कंपनीने अनेक मोठ्या घोषणा करणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Apple Watch 10 Series आणि Watch Ultra 2 च्या विशेष स्पेक्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हाला या स्मार्टवॉचेसमध्ये अनेक अपग्रेड, आरोग्यविषयक फीचर्स इ. देण्यात आले आहेत.
Apple च्या Watch 10 Series ची किंमत $399 पासून सुरू होते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचची विक्री येत्या 20 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे.
Apple Watch 10 Series मध्ये अधिक राऊंडेड कॉर्नर्स, थिनर बेझेल, Apple चा पहिला वाइड-एंगल OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. लेटेस्ट सिरीज 9 सिरीज पेक्षा 40 pct ब्राईट आहे. नवीन वॉच फेसेस स्क्रीनवर सेकंद सेकंदाने रंग भरतात. त्याबरोबरच, यात पॉलिश ॲल्युमिनियमसह नवीन जेट ब्लॅक केस, तसेच रोज गोल्ड आणि सिल्वर ॲल्युमिनियम हे इतर कलर ऑप्शन्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, लेटेस्ट Apple वॉच सर्वात स्लिम आहे, ज्याचे डायमेंशन 9.7 मिमी आहे. नवी सिरीज जुन्या 9 सिरीजपेक्षा 10pct थिन आहे.
तुम्ही प्रथमच वॉच स्पीकरवरून थेट संगीत आणि पॉडकास्टसारखे मीडिया प्ले करू शकता. यात मोठे आणि अधिक कार्यक्षम चार्जिंग कॉइल आहे. ही सर्वात जलद चार्जिंग ऍपल वॉच आहे, जी 30 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज होते. आरोग्य फीचर्समध्ये मध्ये तुम्हाला तुमचे औषध घेण्याची आठवण करून दिली जाईल. याव्यतिरिक्त, त्यात पर्यावरणीय सूचना, AFib अलर्ट, प्रगत झोप ट्रॅकिंग समाविष्ट आहे. हे घड्याळ OS 11 वर चालते. ही वॉच पूर्ण चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत चालेल.
ही वॉच Sleep Apnea फिचरसह लाँच करण्यात आली आहे. स्लीप एपनिया हा एक प्रकारचा स्लीपिंग डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये झोपताना श्वासोच्छवास थांबतो. जेव्हा वायुमार्गात अडथळा येतो किंवा मेंदू श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा असे होते.
स्लीप एपनियासाठी, ही एक सामान्य स्थिती आहे जी झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात विराम देते. Apple Watch Series 10 मध्ये स्लीप एपनिया थेट शोधण्यासाठी म्हणजेच डिटेक्ट करण्यासाठी विशिष्ट फिचर नाही. मात्र, तो कालावधी, कॉलिटी आणि स्टेजेस यासह झोपेचे नमुने ट्रॅक करू शकतो. याव्यतिरिक्त, ही वॉच हृदयाच्या अनियमित लय शोधू शकते, जे स्लीप एपनिया असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला स्लीप एपनिया असल्याची शंका असल्यास, योग्य निदान आणि उपचारांसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Apple Watch Ultra 2 ची किंमत 799 डॉलर आहे. त्याचे प्री-बुकिंगही आजपासून सुरू झाले आहे. 20 सप्टेंबरपासून तुम्ही ते खरेदी करू शकाल. ही अल्ट्रा वॉच नवीन फिनिशसह सादर करण्यात आली आहे. हे नॅचरल आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.