अनेक सेफ्टी फीचर्ससह लहान मुलांसाठी Smartwatch भारतात लाँच! 4G सिम, कॅमेरा आणि लाइव्ह GPS चे समर्थन
Pebbal ने kids-centric smartwatch Pebble Junior भारतात लाँच केली.
नवी Pebble Junior किड्स स्मार्टवॉच कंपनीने 5,999 रुपयांना लाँच
Pebble Junior किड्स स्मार्टवॉच अनेक स्मार्ट आणि सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे.
घराबाहेर लहान मुलांना ट्युशन किंवा स्कुलमध्ये एकटे पाठवणे इ. शहरात आणि सर्वत्र जरा धोक्याचे असते. पण, लहान मुलांचा हाती स्मार्टफोन किंवा फोन देणे सुद्धा योग्य नाही. मग अशा वेळी काय करावे? काळजी करू नका. पालकांच्या या समस्येवर निराकरण म्हणून प्रसिद्ध टेक कंपनी Pebbal ने kids-centric smartwatch Pebble Junior भारतात लाँच केली आहे, जी अगदी अप्रतिम सेफ्टी फीचर्ससह येते.
Also Read: 32MP फ्रंट कॅमेरासह स्वस्तात OPPO Reno 11 5G खरेदी करण्याची संधी, पहा Best डील
Pebble Junior स्मार्टवॉचची किंमत
नवी Pebble Junior किड्स स्मार्टवॉच कंपनीने 5,999 रुपयांना लाँच केली आहे. या स्मार्टवाचीची विक्री देखील भारतात सुरू झाली आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी हे 4G स्मार्टवॉच 200 रुपयांच्या सवलतीसह विकत आहे. त्यामुळे कंपनीच्या वेबसाइटवर स्मार्टवॉचसाड्या 5,699 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. त्याबरोबरच हे स्मार्टवॉच Amazon वरून सुद्धा खरेदी करता येईल.
Pebble Junior स्मार्टवॉचचे फीचर्स
पेबल ज्युनियर 4G स्मार्टवॉचमध्ये 1.7-इंचाची HD स्क्रीन आहे ज्याच्या अगदी वर कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याने सेल्फी काढता येतात. यामध्ये स्टॉपवॉच आणि कॅल्क्युलेटरसह चॅटिंगचे पर्याय सुद्धा आहेत. पाण्याच्या प्रतिकारासाठी ही वॉच IP67 रेट केलेले आहे. यामुळे हात ओले असतानाही हे उपकरण सुरक्षित राहील. या किड्स स्मार्टवॉचमध्ये 680mAh बॅटरी आहे. सामान्य वापरात ही सहजपणे दोन दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. Pebble Junior स्मार्टवॉच एक 4G स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये कोणत्याही कंपनीचे सिम स्थापित करता येते.
सेफ्टी फीचर्स
वॉचमध्ये सिम टाकल्यानंतर त्यातून फोन कॉल्स देखील करता येतात. या स्मार्टवॉचमध्ये टू वे HD व्हिडिओ कॉलिंगची सुविधा आहे. ज्याद्वारे पालक आणि मुले एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर सुद्धा बोलू शकतात. तसेच, यात जिओ फेन्सिंग आणि लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग फीचर सुद्धा आहे, ज्यामुळे मुलांच्या लोकेशनवर नेहमी नजर ठेवता येते. एखादी चुकीची लोकेशन आढळल्यास तुम्ही लगेच तिथे जाऊ शकता.
विशेष म्हणजेच पेबल ज्युनियर स्मार्टवॉचमध्ये एक डेडिकेटेड SOS बटण आहे, ते दाबल्यावर कुटुंबातील सदस्यांना आपत्कालीन कॉल केला जाईल. तसेच, हे 4G स्मार्टवॉच पॅरेंटल कंट्रोलसह देखील येते, ज्यामध्ये कुटुंबातील 5 सदस्यांना एकाच वेळी प्रायमरी आणि आपत्कालीन संपर्क म्हणून जोडता येईल. तसेच, क्लास मोड, रिमोट फोटो कॅप्चर आणि ॲम्बियंट व्हॉईस मॉनिटरिंग सारखी उपयुक्त वैशिष्ट्ये पॅरेंटल कंट्रोलमध्ये उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile