AI फीचर्ससह नवी itel Unicorn Max स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये?

itel ने ही itel Unicorn Max स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे.
itel ने ही कंपनीची नवीनतम परवडणारी स्मार्टवॉच सादर केली आहे.
कॉलिंगसाठी ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते, ज्यामध्ये AI नॉइज रिडक्शन सपोर्ट आहे.
itel Unicorn Max स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आली आहे. itel ने ही कंपनीची नवीनतम परवडणारी स्मार्टवॉच सादर केली आहे, जी अनेक उत्तम फीचर्ससह सुसज्ज आहे. ही वॉच दोन हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनीने यामध्ये लहान व्हिडिओ वॉच फेस देखील दिले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात itel Unicorn Max स्मार्टवॉचची किंमत आणि सर्व फीचर्स-
Also Read: New! महागड्या फोनच्या फीचर्ससह आला नवा Samsung फोन, किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी
itel Unicorn Max स्मार्टवॉचची किंमत
itel Unicorn Max स्मार्टवॉचबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 1,999 रुपयांच्या किमतीत Itel Unicorn Max सादर केला आहे. हे मेटेओराइट ग्रे, कॉपर गोल्ड आणि ऍल्युमिनियम सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही स्मार्टवॉच प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरून खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
itel Unicorn Max वॉचचे फीचर्स आणि स्पेक्स
Itel Unicorn Max मध्ये 1.43-इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टवॉचमध्ये 200 हून अधिक वॉच फेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये लहान व्हिडिओ वॉच फेस देखील मिळतील. या वॉचमध्ये ड्युअल कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, कॉलिंगसाठी ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते, ज्यामध्ये AI नॉइज रिडक्शन सपोर्ट आहे.
स्मार्टवॉचमध्ये अनेक आरोग्यविषयक फीचर्स मिळतात. यामध्ये तुम्हाला आरोग्य हार्ट रेट सेन्सर्स, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि फिमेल सायकल ट्रॅकिंगची अनेक फीचर्स मिळतात. याव्यतिरिक्त, त्यात 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देखील आहेत. तसेच, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये क्विक मेसेज रिप्लाय, रिमोट कॅमेरा शटर आणि ‘फाइंड माय फोन’ फंक्शन सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile