Inbase ने भारतात दोन नवीन स्मार्टवॉच 'Inbase Urban Pro X' आणि 'Inbase Urban Pro 2' लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे स्मार्टवॉच वापरकर्त्याला बोर होऊ देणार नाही. कारण यमध्ये इनबिल्ट गेमची सुविधा मिळते. ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणारे, हे दोन नवीन स्मार्टवॉच मोठ्या डिस्प्ले, बरेच मेनू स्टाईल, हाय-डेफिनिशन हँड्स फ्री कॉलिंग, 120+ स्पोर्ट्स मोड, स्मार्टफोन आणि म्युझिक कंट्रोल, उत्तम बॅटरी लाईफ आणि बरेच काही यासारख्या अनेक नवीन फीचर्ससह येतात. जाणून घेऊयात सविस्तर तपशील…
हे सुद्धा वाचा : FLIPKART वर टीव्ही डेज सेलमध्ये 12,000 रुपयांपासून स्वस्त मिळत NOKIA टीव्ही
हे स्मार्टवॉच मोठ्या 1.8-इंच लांबीच्या डिस्प्लेसह वापरण्यास अत्यंत सोपे आहे. यात 8 मेनू स्टाईल आणि 100+ वॉच फेस आहेत. जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर त्यात 4 इनबिल्ट गेम देखील आहेत. याशिवाय यात हवामानाचा अंदाज, कॅमेरा कंट्रोल, कॅल्क्युलेटर आणि ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टंट सारखे फीचर्स देखील आहेत.
ही स्मार्टवॉच HD मायक्रोफोन आणि स्पीकर सारख्या फीचर्ससह येईल, जे कॉल्स किंवा म्युझिक प्लेबॅकचा रिच ऑडिओ अनुभव देतात. तसेच, या वॉचच्या मदतीने तुम्ही 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SPO2 लेवल, रक्तदाब मॉनिटर आणि बर्न झालेल्या कॅलरीज ट्रॅक करू शकता. Urban Pro X मोठ्या बॅटरीसह येतो, जर तुम्ही कॉलिंग फिचर नियमितपणे वापरत असाल तर बॅटरी 5 दिवस टिकते आणि जर इनबिल्ट नोटिफिकेशन वापरत असाल तर बॅटरी 14 दिवस चालेल.
प्रीमियम-डिझाइन केलेले हे स्मार्टवॉच हलके IPX67 अल्युमिनियम पीसी केसिंगचे बनलेले आहे, याचा अर्थ तुम्ही ते सर्व हवामानात घालू शकता. यात मोठा 1.7-इंच लांबीचा अल्ट्रा-ब्राइट टचस्क्रीन डिस्प्ले आहे. वॉच 8 पेक्षा जास्त मेनू स्टाईल आणि 100+ कस्टमाइजेबल वॉच फेससह स्मार्ट यूजर इंटरफेससह येते. इन-बिल्ट हाय-डेफिनिशन स्पीकर आणि मायक्रोफोनसह, तुम्ही तुमच्या वॉचवरून थेट कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्ट करू शकता. दूरवर बसूनही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा म्युझिक ट्रॅक, व्हॉल्यूम आणि कॅमेरा कन्ट्रोल करू शकता.
हे स्मार्टवॉच तुमचे हार्ट रेट, रक्तदाब 24/7 ट्रॅक करते. याबरोरबच यात अनेक हेल्थ फीचर्स मिळतील. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करण्यासाठी त्याच्या दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकरमध्ये 120+ स्पोर्ट्स मोड आहेत. इतकेच नाही तर इनबेस अर्बन प्रो 2 हवामानाचा अंदाज, कॅल्क्युलेटर आणि ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टंट यांसारख्या फीचर्ससह देखील येते. त्याच्या स्मार्ट कंजंक्शन फिचरसह, ते एका चार्जवर सुमारे 14 दिवस टिकते.
इनबेस अर्बन प्रो एक्स आणि अर्बन प्रो 2 स्मार्टवॉचची किंमत अनुक्रमे 2,799 आणि 2,499 रुपये आहे. ही प्रास्ताविक किंमत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ग्राहकांना ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, gourban.in, amazon.com आणि इतर आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच एका वर्षाच्या वॉरंटीसह येते.