भारतीय वेअरेबल मार्केट अलीकडच्या काळात प्रचंड वाढले आहे. नव्या प्लेयर्सची एंट्री आणि देशांतर्गत ब्रँड्सचा या सेगमेंटमध्ये बराच प्रभाव पडला आहे. नवनवीन ब्रँड्स या सेगमेंटमध्ये सातत्याने प्रवेश करत आहेत. ऍक्सेसरीज ब्रँड Inbase ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Urban FIT S लाँच केले आहे.
हे सुद्धा वाचा : FACEBOOK कडून युजर्सना गिफ्ट : युजर्सना एका अकाउंटमध्ये बनवता येतील एकूण 5 प्रोफाईल, वाचा सविस्तर
हे स्मार्टवॉच Apple वॉच सारख्या डिझाइनसह येते. यात 1.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टवॉचला 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. Inbase Urban FIT S मध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि आरोग्य आणि फिटनेस मॉनिटरिंगशी संबंधित सर्व आवश्यक फीचर्स आहेत. तुम्हाला हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
जरी कंपनीने हे वॉच 12,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट केले आहे, परंतु सध्या तुम्ही Inbase Urban FIT S 4,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. यावर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळतेय. ब्रँडने या स्मार्टवॉचला चार कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे.
Inbase Urban FIT S मध्ये 550Nits च्या ब्राइटनेससह 1.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंगसह 120 स्पोर्ट मोड मिळतात. या स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही कॉलिंग देखील करू शकता. यात मायक्रोफोन आणि स्पीकर आहे, जो कॉल करण्यासाठी आणि रिसिव्ह करण्यासाठी वापरला जातो.
हे डिव्हाईस अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर वापरले जाऊ शकते. डिव्हाइसमध्ये 250mAh बॅटरी आहे, जी दोन तासांत पूर्ण चार्ज होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. फुल चार्ज झाल्यानंतर तुम्ही हे डिवाइस तब्बल 10 दिवसांपर्यंत वापरू शकता. यामध्ये 30 दिवसांचा स्टॅन्ड बाय टाइम मिळेल.
याव्यतिरिक्त, वॉचमध्ये रोटेट क्राऊनचे फिचरदेखील मिळेल. यामध्ये व्हॉइस असिस्टंटचे सपोर्ट आहे. तुम्ही केवळ फोनचे म्युझिक कंट्रोलच करू शकत नाही तर ते याद्वारे ऐकता देखील येईल. डिवाइस वेदर फोरकास्ट आणि मल्टिपल वॉच फेससारख्या ऑप्शनसह येतो. ही IPX67 रेटिंग वाली स्मार्टवॉच आहे.