HTC च्या स्मार्टवॉचचा आकार गोल असू शकतो. त्याचबरोबर ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 360x360 पिक्सेल असण्याची शक्यता आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी HTC लवकरच बाजारात आपले स्मार्टवॉच वन लाँच करणार आहे. HTC फेब्रुवारी 2016 मध्ये ही स्मार्टवॉच लाँच करु शकते. सध्यातरी HTC ह्या स्मार्टवॉचवर काम करत आहे आणि ह्याबाबत इंटरनेटवरही बरीच चर्चा सुरु आहे. तथापि, अजूनपर्यंत कंपनीने आपल्या ह्या स्मार्टवॉचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इविलिक्सद्वारा ट्विटच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की, HTC वन स्मार्टवॉचला ही कंपनी फेब्रुवारी २०१६ मध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या दरम्यान प्रदर्शित करु शकते. तथापि, आतापर्यंत HTC वन स्मार्टवॉचच्या फीचर्स आणि डिझाईनविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जर ह्याच्या लीक्सविषयी बोलायचे झाले तर, त्यावरुन HTC च्या स्मार्टवॉचचा आकार गोल असू शकतो. त्याचबरोबर ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 360×360 पिक्सेल असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अशी आशा आहे की, हे स्मार्टवॉच अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल. मात्र हे अॅनड्रॉईड व्हर्जन कोणते असेल याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
तसेच ह्या फोनच्या फीचर्सबाबत आणि किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.