Honor ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Honor Watch GS 3 लाँच केले आहे. वॉचमध्ये, कंपनी ब्लूटूथ कॉलिंग, ड्युअल GPS सिस्टम आणि हार्ट रेट सेन्सरसह SpO2 सेन्सर देखील देत आहे. वॉचची विशेषता म्हणजे ते दोन आठवड्यांपर्यंत बॅटरी लाइफसह येते. Honor Watch GS3 ची किंमत 12,999 रुपये आहे. ओशन ब्लू, क्लासिक गोल्ड आणि मिडनाईट कलर ऑप्शन्समध्ये येत असलेल्या या वॉचची विक्री 7 जून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. तुम्हाला ही वॉच Amazon India वरून खरेदी करता येईल. सेलमध्ये तुम्ही बँक ऑफ बडोदा किंवा सिटी बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% सूट देखील मिळेल.
हे सुद्धा वाचा: आकर्षक डिझाईनसह Motorola चा 5G फोन आज भारतात लाँच होणार, बघा किंमत आणि अप्रतिम फीचर्स
वॉचमध्ये 466×466 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 326ppi सह येतो. वॉचमध्ये बरेच टच इनपुट आणि जेश्चरचे सपोर्ट आहे. यासोबतच कंपनी वॉचमध्ये प्रेस आणि होल्ड कमांड देखील देत आहे. या स्मार्टवॉचची बॉडी मेटल आणि प्लास्टिकची बनलेली आहे. या स्मार्टवॉचचे वजन 44 ग्रॅम आहे. इथे खरेदी करा
4 GB स्टोरेज असलेल्या या वॉचमध्ये आऊटडोअर ऍक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी इन बिल्ट GPS देण्यात आले आहे. तुम्हाला घड्याळात इनबिल्ट स्पीकर आणि माइक देखील मिळेल. ज्यामुळे, तुम्हाला सहजतेने कुठल्याही ठिकाणी कॉल रिसिव्ह करता येईल. वॉचच्या बाजूला दोन बटन्स आहेत. ऑनरच्या या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत. इथे खरेदी करा
वॉचमध्ये कंपनी AI ड्युअल इंजिन हार्ट रेट अल्गोरिदमसह हार्ट रेट सेंसर देत आहे. यासोबतच, SpO2 मॉनिटर आणि 100 हून अधिक वर्कआउट मोड्स यामध्ये देण्यात आले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर एकाच चार्जवर, या वॉचची बॅटरी तब्बल 14 दिवस टिकते. यात मॅग्नेटिक पिन सपोर्टसह फास्ट चार्जिंग देखील आहे. वॉचमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फीचर्समध्ये अलार्म क्लॉक, म्युझिक प्लेबॅक आणि व्हॉइस असिस्टंट यांचा देखील समावेश आहे. इथे खरेदी करा