ऑनर बँड Z1 भारतात विक्रीसाठी उपलब्ध

ऑनर बँड Z1 भारतात विक्रीसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

ह्या डिवाइसमध्ये कॉल, SMS आणि कॅलेंडर इ. नोटिफिकेशन सुविधाही उपलब्ध आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ऑनरचा हल्लीच लाँच केलेला बँड Z1 भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. भारतीय बाजारात ह्या डिवाइसची किंमत ५,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा एक्सक्लुसिव्हली ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर खरेदी केला जाऊ शकतो.

 

कंपनीने ऑक्टोबरमध्ये ऑनर 7 स्मार्टफोनसह बँड Z1सुद्धा भारतात लाँच केला होता. बँड Z1 दोन प्रकारात उपलब्ध आहे. हा डिवाईस अॅनड्रॉईड 4.4 किंवा त्यापेक्षा जास्त IOS 7.0 किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनने कनेक्ट असू शकतो.

जर ह्या बँडच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.06 इंचाची OLED टचस्क्रीन डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 128×128 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसला कोर्टेक्स M4 STM32F411 चिपसेटसह आणले आहे. ऑनर बँड Z1 मध्ये 128KB अंतर्गत स्टोरेज आहे.

त्याचबरोबर ह्या डिवाइसमध्ये 70mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर बॅटरीमध्ये वायरलेस चार्जिंगचा उपयोग केला गेला आहे, ज्याच्या द्वारे केवळ दी़ड तासात ही पुर्ण चार्ज होऊ शकते.

ऑनर बँड Z1 IP68 प्रमाणित आहे, जे हा पाणी आणि धूळीपासून संरक्षित असण्याची खात्री देतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथसुद्धा उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा बँड १० मीटर पाण्यात अर्धा तास कार्य करतो.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo