दोन्ही स्मार्टवॉचमध्ये वॉटर रेझिस्टंटसाठी IP67 रेटिंग
भारतीय कंपनी HAMMER ने आपले नवीनतम स्मार्टवॉच HAMMER Stroke आणि Ace Ultra हे वेअरेबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टवॉच कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आले आहेत. नवे स्मार्टवॉच अनेक नवीन फीचर्ससह सुसज्ज आहेत. चला जाणून घेऊया स्मार्टवॉचेसची किंमत आणि फीचर्स –
HAMMER Stroke आणि Ace Ultra ची किंमत
HAMMER Stroke स्मार्टवॉचची किंमत 2,199 रुपये आहे. तसेच, हॅमर Ace Ultraची किंमत 2,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टवॉच Amazon, Myntra, Flipkart, Reliance Digital, Nykaa, Tata क्लिक आणि क्रेड वरून खरेदी करता येतील.
स्पेसिफिकेशन्स
दोन्ही स्मार्टवॉचमध्ये 1.96-इंच लांबीचा IPS टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. हॅमर स्ट्रोक स्मार्टवॉच तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होण्यासाठी ब्लूटूथ- सिम्पल दिले गेले आहे. ते iOS आणि Android दोन्ही उपकरणांसह कनेक्ट केले जाऊ शकते. दोन्ही स्मार्टवॉचमध्ये वॉटर रेझिस्टंटसाठी IP67 रेटिंग देखील आहे.
आरोग्यविषक फीचर्स म्हणून वॉचमध्ये स्टेप काउंट, कॅलरी बर्न, हार्ट रेट आणि इतर महत्त्वाचे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स आहेत. यात तुम्हाला इनबिल्ट GPS देखील मिळणार आहे. त्याबरोबरच, वॉचमध्ये कॉल, मॅसेज, सोशल मीडिया अपडेट्स, हेल्थ डेटा, डेली स्टेप काउंट यांसारख्या ऍक्टिव्हिटी मॉनिटर करता येतील. यामध्ये तुम्ही 50 पर्यंत काँटॅक्ट्स सेव्ह करू शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.