आकर्षक Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 भारतात लाँच, पहा किंमत आणि सर्व डिटेल्स

आकर्षक Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 भारतात लाँच, पहा किंमत आणि सर्व डिटेल्स
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds pro 2 लाँच

नेक्स्ट जनरेशनचे स्मार्टवॉच आणि TWS आता अनेक अपग्रेडसह आणले गेले आहेत.

Google ची ही नवी उपकरणे 22 ऑगस्ट 2024 पासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होतील.

नुकतेच पार पडलेल्या Made By Google इव्हेंटमध्ये कंपनीने नव्या स्मार्टफोन सिरीजसह Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds pro 2 ही उपकरणे देखील सादर केली आहेत. या उपकरणांची प्रतीक्षा चाहते बरेच दिवसांपासून करत होते, हे डिवाइस लाँच केले आहेत. नेक्स्ट जनरेशनचे स्मार्टवॉच आणि TWS आता अनेक अपग्रेडसह आणले गेले आहेत. त्याबरोबरच, कंपनीने Google Pixel 9 सिरीजदेखील सादर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 ची भारतीय किंमत-

Google Pixel Watch 3 आणि Buds Pro 2 ची किंमत

Google Pixel Watch 3 स्मार्टवॉचची किंमत 39,900 रुपयांपासून सुरू होते. ही किमत स्मार्टवॉचच्या 41mm व्हेरियंटसाठी आहे. तर, 45mm व्हेरिएंट देखील भारतात 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणला गेला आहे. तर, दुसरीकडे Pixel Buds Pro 2 ची किंमत 22,900 रुपये आहे. हे Aloe, Charcoal, Hot Pink आणि Porcelain, colourways कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Google ची ही नवी उपकरणे 22 ऑगस्ट 2024 पासून Flipkart, रिलायन्स डिजिटल आणि Croma वर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

Google Pixel Watch 3

Google Pixel Watch 3 कंपनीने दोन आकारात आणले आहे. यामध्ये 41 मिमी आणि 45 मिमी समाविष्ट आहे. ही स्मार्टवॉच कस्टम 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.3, NFC आणि Wi-Fi 802.11 देखील आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टवॉचमध्ये GPS ही उपलब्ध आहे. 41mm वेरिएंटमध्ये 307mah देण्यात आला आहे. यात Qualcomm SW5100 चिप आहे. हे Wear OS 5.0 वर चालते.

तुम्ही हे घड्याळ Android 10.0 आणि वरील OS वर काम करणाऱ्या फोनसह कनेक्ट करण्यात सक्षम असाल. 41 मिमी आकाराचे वॉच चार कलर ऑप्शन्ससह आणि मोठ्या डायलसह वॉच तीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आली आहे.

Google Pixel Watch 3 and Pixel Buds Pro 2

Google Pixel Buds Pro 2

Google Pixel Buds Pro 2 मध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर उपलब्ध आहे. या बड्सला IP54 रेटिंग मिळाले आहे. यात ब्लूटूथ 5.4 आहे. 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स TWS मध्ये उपलब्ध आहेत. हे इयरबड्स तीन मायक्रोफोनसह येतात. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे. तर, चार्जिंग केससह पूर्ण चार्ज झाल्यावर TWS 48 तास टिकते. पाच मिनिटांच्या चार्जवर 1.5 तासांपर्यंत बड्स टिकण्याची क्षमता ठेवतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo