1.8-इंच AMOLED कॉस्मिक डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंगसह Fitshot Crystal लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 24-Aug-2022
HIGHLIGHTS

Fitshot Crystal नवी स्मार्टवॉच लाँच

नवीन स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल

देशातील पहिले ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच

 इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड फिटशॉटने भारतात  Fitshot Crystal स्मार्टवॉच लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, Fitshot Crystal हे देशातील पहिले ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे, जे 1.8-इंच AMOLED कॉस्मिक डिस्प्लेसह येते. प्रीमियम डिझाइनसह येत असलेल्या, या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगसाठी इनबिल्ट स्पीकर आणि माइक आहे. वॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस, सायकलिंग आणि रनिंग यासारखे 100 स्पोर्ट्स मोड आहेत.

हे सुद्धा वाचा : Jio In-Flight plans : आता कॉल-SMS आणि इंटरनेटचा वापर विमानात बसूनही करता येईल

Fitshot Crystal चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टवॉचमध्ये 1.8-इंच लांबीचा AMOLED कॉस्मिक डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेट, 368×448 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 560 nits ब्राइटनेससह येतो. ब्लूटूथ कॉलिंगसाठी वॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइक आहे. यासोबतच यामध्ये कॉल डायल सारखे पर्यायही उपलब्ध आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही वॉच सात दिवस चालवता येईल, असा कंपनीचा दावा आहे. फिटशॉट क्रिस्टलमध्ये डान्स, क्रिकेट, रनिंग, बॉक्सिंग यासारखे 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स आहेत. 

हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2, स्ट्रेस, स्लीप मॉनिटर आणि फिमेल सायकल ट्रॅकिंग यासारख्या आरोग्य ट्रॅकिंग फीचर्ससह स्मार्टवॉच येते. या वॉचमध्ये फाईंड माय डिव्हाइस, कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल, कॅल्क्युलेटर, फ्लॅश लाइट आणि वेदर फोरकास्ट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. Fitshot Crystal ला वॉटर रेसिस्टेंटसाठी IP68 रेटिंग मिळते.

किंमत :

Flipkart वरून Fitshot Crystal 2,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजतापासून ही वॉच खरेदीसाठी उपलब्ध होईल. ही स्मार्टवॉच ग्रे, ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :