देशांतर्गत कंपनी Fire Bolttने आपले नवीन स्मार्टवॉच Fire Boltt Ring Plus भारतात लाँच केले आहे. फायर-बोल्ट रिंग प्लस स्मार्टवॉचसह 1.91-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो या सेगमेंटमधील सर्वात मोठा वॉच डिस्प्ले असल्याचा दावा केला जात आहे. फायर-बोल्ट रिंग प्लसमध्ये स्क्वेअर डायल देण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : काय आहे WhatsApp Communities फिचर ? जाणून घ्या 'कशा'प्रकारे वापराल नवे फीचर…
फायर-बोल्ट रिंग प्लससह 1.91-इंच लांबीचा HD फुल टच डिस्प्ले मिळतो. यात 100+ स्पोर्ट्स मोड मिळतील. Fire Boltt Ring Plus पुल मेटल बॉडीसह उपलब्ध आहे. ही वॉच ब्लॅक, ब्लु बिंज, रेड आणि व्हाईट या पाच कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फायर-बोल्ट रिंग प्लससह AI व्हॉईस असिस्टंटचा देखील सपोर्ट असेल.
फायर-बोल्ट रिंग प्लस क्विक ऍक्सेस फिचरसह देखील येते. ज्यामुळे तुम्ही डायलपॅड, कॉल हिस्ट्री, सिंक कॉन्टॅक्ट इत्यादी लगेच ऍक्सेस करू शकतो. SPO2 सेन्सर हेल्थ फीचर्स म्हणून त्यात उपलब्ध आहे. याशिवाय यात हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरींग देखील आहे. याशिवाय, यामध्ये कॉलिंग फीचर आहे आणि यासाठी यात मायक्रोफोन आणि इनबिल्ट स्पीकर आहे. या वॉचमध्ये तुम्ही फोनचा कॅमेरा देखील ऑपरेट करू शकता.
फायर-बोल्ट रिंग प्लसची किंमत 2,499 रुपये आहे. ती AMAZON आणि फायर-बोल्टच्या साइटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.