भन्नाट ऑफर ! 18 हजारांची Fire-Boltt स्मार्टवॉच केवळ 1,799 रुपयांमध्ये उपलब्ध

भन्नाट ऑफर ! 18 हजारांची Fire-Boltt स्मार्टवॉच केवळ 1,799 रुपयांमध्ये उपलब्ध
HIGHLIGHTS

Fire-Boltt Ninja Call Pro वर प्रचंड सवलत

Amazon वरून ही वॉच तब्बल 90% डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

त्याबरोबरच इतर ऑफर्सही तुम्हाला मिळणार आहेत.

जर तुम्ही तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कमी किमतीत Fire-Boltt Ninja Call Pro खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. होय, ई-कॉमर्स साइट Amazon वर Fire-Boltt Ninja Call Pro वर खूप मोठी सूट मिळत आहे. 

हे सुद्धा वाचा : Airtelचा मोठा धमाका, फक्त 149 रुपयांमध्ये डेटासह मिळतील OTT फायदे

Fire-Boltt Ninja Call Pro किंमत आणि ऑफर 

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ई-कॉमर्स साइट Amazon वर Fire-Boltt Ninja Call Pro Smart Watch ची MRP 17,999 रुपये आहे, परंतु 90% डिस्काउंटनंतर ती 1,799 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

बँक ऑफर म्हणून, फेडरल बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 10% झटपट सवलत म्हणजेच रु. 1250 पर्यंत बचत होऊ शकते. याशिवाय HSBC कॅशबॅक कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट म्हणजेच 250 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

Fire-Boltt Ninja Call Pro

या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हेल्थ फीचर्स म्हणून या स्मार्टवॉचमध्ये SpO2 आणि हृदय गती मॉनिटरिंगला सपोर्ट आहे. जर तुम्ही क्रीडाप्रेमी असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डिवाइस फुटबॉल, क्रिकेट आणि कबड्डी इत्यादी 100 हून अधिक स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते.

त्याबरोबरच, या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे कॉल्स उचलता आणि डायल करता येतात. हे घड्याळ AI व्हॉईस असिस्टंटला सपोर्ट करते. यात स्पीकर आणि मायक्रोफोन बिल्ट इन आहे. या स्मार्टवॉचमध्ये डायल पॅड उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनचे कॉन्टॅक्ट सिंक करता येतात आणि कॉल करता येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo