हायपरअडाप्ट 1.0: Nike ने लाँच केला हा स्मार्ट बूट

हायपरअडाप्ट 1.0: Nike ने लाँच केला हा स्मार्ट बूट
HIGHLIGHTS

Nike ने हायपरअडाप्ट 1.0 नावाचा आपला एक नवीन स्मार्ट बूट लाँच केला आहे, जो आपली लेस स्वत:च बांधतो आणि ह्यात एक स्मार्ट सेंसरसुद्धा आहेत.

Nike ने हायपरअडाप्ट 1.0 नावाचा आपला एक नवीन स्मार्ट बूट लाँच केला आहे, हा एक स्पोर्ट्स बूट आहे आणि हा  आपली लेस स्वत:च बांधतो. कंपनीने आपल्या ह्या स्मार्ट बूटला न्यू यॉर्कमध्ये आयोजित केलेल्या नायकी इनोवेशन समिटमध्ये सादर केले.

 

नायकीने अशी माहिती दिली आहे की, ह्या बूटात जी टेक्निक दिली आहे, कंपनीने त्याला ‘एडाप्टीव लेसिंग टेक्नॉलॉजी’ असे नाव दिले आहे. कंपनीने आता ह्या टेक्नॉलॉजीवर आधारित बूटांची एक पुर्ण रेंज उतरवण्याबाबत विचार करत आहे.

ह्या बूटांविषयी बोलायचे झाले तर, हा बूट जर कोणी घातला तर, त्याची लेस आपोआप बांधली जाते. ह्याच्या टाचांमध्ये बसवलेल्या सेंसरमुळे ही गोष्ट होते. ह्या सेंसरला जेव्हा कळते की, हा बूट कोणीतरी घातला आहे, तेव्हा तो बूट आपोआप त्याची लेस बांधतो.

नायकी हायपरअडाप्ट 1.0 बूट लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा तीन रंगांत उपलब्ध होईल. तथापि हा बूट केवळ Nike+ सदस्यांनाच मिळेल. मात्र कंपनीने अजूनपर्यंत तरी ह्या स्मार्ट बूटच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. हा बूट कसे काम करतो हे आपण खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये पाहू शकता.

 

हेदेखील वाचा – आता गुगल मॅप्सवरही शोधता येईल ओला आणि उबर कॅब्स

हेदेखील वाचा- हे अॅप्स तुम्हाला बनवतील एकदम नवीन आणि हायटेक

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo