Diwali Gift For Wife: सध्या जिकडे तिकडे दिवाळीचे वातावरण सुरु आहे. भारतात सर्वत्र बाजारपेठा दिवे, सजावटीच्या वस्तू, रांगोळ्या, फुलं इ. सजलेल्या आहेत. एवढेच नाही तर, टेक विश्वात देखील सर्व कंपन्यानी आपल्या उत्पादनांवर भारतीयांसाठी दिवाळीचे ऑफर्स जारी केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवाळीला आपल्या कुटुंबियांना आणि जोडीदाराला भेटवस्तू दिल्या जातात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या पत्नीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी सर्वोत्तम स्मार्टवॉचेस पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत. स्मार्टवॉचेस तुमच्या पत्नीच्या फिटनेस आणि आरोग्यावर निरीक्षण ठेवण्यास उपयुक्त ठरतील. या स्मार्टवॉचेस तुम्हाला 2000 रुपयांच्या किमतीत मिळतील. यादी पुढीलप्रमाणे:
Also Read: Diwali Gift Ideas: दिवाळीला प्रियजनांना गिफ्ट करा ‘हे’ बेस्ट टेक गॅजेट्स, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध
Noise ColorFit Pulse Grand स्मार्टवॉच Amazon वर 999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ही 1.69 इंच HD डिस्प्लेसह 2000 रुपयांअंतर्गत स्मार्टवॉच आहे. या स्मार्ट वॉचमध्ये अनेक आकर्षक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. फिटनेससाठी यात 60 स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. ही वॉच हार्ट रेट आणि SpO2 चे निरीक्षण, झोप, तणाव आणि मासिक पाळी देखील ट्रॅक करू शकते. 15 मिनिटे चार्ज केल्यानंतर ते 25 तास सतत वापरता येईल. कमी किमतीत तुमच्या पत्नीला गिफ्ट करण्यासाठी ही वॉच बेस्ट आहे.
boAt Wave Lite स्मार्टवॉच Amazon वर 1,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. 4.5 स्टार रेटिंगसह येणारे हे घड्याळ प्रीमियम दर्जाचे आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनगटावरूनच कॉल रिसिव्ह करू शकता. ही स्मार्टवॉच प्रो पिंक, प्रो ब्लॅक, प्रो ग्रे, टींट सिल्वर इ. अनेक कलर ऑप्शन्ससह खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Amazfit Bip 3 स्मार्टवॉच देखील 2000 रुपयांच्या अंतर्गत उपलब्ध आहे. ही स्मार्टवॉच तुमच्या पत्नीच्या दैनंदिन फिटनेस क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. या बेस्ट Amazfit स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळेल. आरोग्यासाठी, या स्मार्टवॉचमध्ये 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि धावणे, चालणे आणि सायकलिंग यांसारखे प्रमुख गेमिंग मोड आहेत. ही वॉच इनबिल्ट वॉच फेसेससह येते.
CrossBeats Aura Round स्मार्टवॉच देखील 2000 रुपयांच्या अंतर्गत उपलब्ध आहे. Amazon वर ही स्मार्टवॉच 1,699 रुपयांना उपलब्ध आहे. ही वॉच ब्लॅक, सिल्वर, ऑरेंज इ. कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. वॉच म्युझिक कंट्रोल फीचर जेव्हा म्युझिक प्ले होत असेल आणि वॉच ब्लूटूथशी कनेक्ट केलेले असेल, तेव्हा तुम्ही या फिचरद्वारे व्हॉल्यूम नियंत्रित करू शकता, ट्रॅक बदलू शकता आणि म्युझिक प्ले/पॉज करू शकता.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलीएट लिंक्स उपलब्ध आहेत.