BoAt ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. हे boAt Wave Ultima स्मार्टवॉच आहे. बोटचे हे नवीन स्मार्टवॉच boAt Wave Ultima Max चे अपग्रेड वर्जन आहे. यामध्ये मोठा, क्रॅक रेसिस्टन्ट डिस्प्ले आहे. बोट वेब अल्टिमामध्ये 1.8-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो HD रिझोल्यूशनसह येतो.
हे सुद्धा वाचा : JIO आणि AIRTEL चा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, हाय-स्पीड इंटरनेटसह मिळेल अमर्यादित डेटा
boAt Wave Ultima स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट HD स्पीकर आणि मायक्रोफोन आहे. कॉल फंक्शन आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ 5.2 देण्यात आला आहे. ही वॉच सामान्य वापरात 10 दिवसांची बॅटरी लाइफ देते, असा कंपनीचा दावा आहे. स्मार्टवॉचमध्ये नोटिफिकेशन, वेदर अपडेट, संगीत आणि कॅमेरा नियंत्रण, सर्च माय फोन यांसारखी फीचर्स आहेत.
boAt Wave Ultima स्मार्टवॉचमध्ये मोठे आणि लाईट वेट अल्युमिनियम अलॉय स्क्वेअर डायल आहे. बोटचे स्मार्टवॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्ट आहे. फिटनेस फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर बोट वेब अल्टिमामध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप मॉनिटर आणि स्ट्रेस ट्रॅकर देण्यात आले आहेत. boAt Wave Ultima स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. स्मार्टवॉचमध्ये ऍम्बियंट साउंड डिटेक्शन फीचरही देण्यात आले आहे.
बोट वेब अल्टिमा स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. हे रॅगिंग रेड, ऍक्टिव्ह ब्लॅक आणि टील ग्रीन या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही फ्लिपकार्ट आणि ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टवॉच खरेदी करू शकता.