कॉलिंग आणि अनेक हेल्थ फिचरसह boAt ने आणले जबरदस्त स्मार्टवॉच, किंमत 2,500 रुपयांपेक्षा कमी

कॉलिंग आणि अनेक हेल्थ फिचरसह boAt ने आणले जबरदस्त स्मार्टवॉच, किंमत 2,500 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

boat Wave Connect नवीन स्मार्टवॉच लाँच

नवीन स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये

वॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी अनेक उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध

boAt ने आपले नवीन स्मार्टवॉच Wave Connect बाजारात आणले आहे. कंपनीने या नवीन स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे. ही वॉच चारकोल ब्लॅक, डीप ब्लू आणि कूल ग्रे या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या वॉचची विक्री 7 जूनपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून देखील बोट वेव्ह कनेक्ट खरेदी करता येईल. यामध्ये 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफसह अनेक महत्त्वाचे हेल्थ आणि फिटनेस सेन्सर देण्यात आले आहेत. ही वॉच ब्लूटूथ कॉलिंगला देखील सपोर्ट करते. चला तर जाणून घेऊयात नव्या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स… 

हे सुद्धा वाचा : 10 हजार रुपयांच्या सवलतीसह Xiaomiचे स्मार्टफोन खरेदी करा, 11 जूनपर्यंत धमाकेदार सेलचा लाभ घ्या

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

बोट वेव्ह कनेक्टमध्ये 1.69-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. कंपनी या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची देखील सुविधा देत ​​आहे. त्याच्या मदतीने, तुम्हाला या डिवाइसमधूनच थेट कॉल कनेक्ट आणि रिसिव्ह करता येईल. कॉलिंगसाठी, वॉचमध्ये क्विक ऍक्सेस डायल पॅड आणि 20 कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याचे ऑप्शन दिले गेले आहे.

वॉचमध्ये, कंपनी हेल्थ आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील ऑफर करत आहे. यामध्ये तुम्हाला हार्ट रेट आणि SpO2 सेन्सरसह स्ट्रेस लेव्हल ट्रॅकर देखील मिळेल. याव्यतिरिक्त, यामध्ये वॉकिंग, रनिंग आणि डान्सिंगसह 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कंपनी या वॉचमध्ये ऑटो वर्कआउट डिटेक्शन फीचर देखील देत आहे.

boatचे हे नवीन स्मार्टवॉच गुगल फिट सपोर्ट आणि ऍपल हेल्थ सर्व्हिससह येते. यामध्ये कंपनी अलेक्सा व्हॉईस असिस्टंट देखील देत आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, या वॉचमध्ये 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ब्लूटूथ कॉलिंग फीचर चालू न करता सिंगल चार्जवर 7 दिवस टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचप्रमाणे, ब्लूटूथ कॉलिंगसह या डिवाइसची बॅटरी सुमारे दोन दिवस चालेल.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo