दीर्घकाळ बॅटरी लाईफसह फक्त 1,299 रुपयांमध्ये भारी Smartwatch लाँच, जाणून घ्या सविस्तर

boAt Storm Infinity स्मार्टवॉच भारतात लाँच झाली आहे.
boAt Storm Infinity स्मार्टवॉचची किंमत 1299 रुपये इतकी आहे.
ही स्मार्टवॉच अनेक फिटनेस आणि हेल्थ फीचर्ससह येईल.
भारतात वेअरेबल डिवाइससाठी प्रसिद्ध असेलेली कंपनी boAt ने नवी स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. boAt Storm Infinity स्मार्टवॉच भारतात लाँच झाली आहे. विशेष म्हणजे एकदा चार्ज केल्यावर ही स्मार्टवॉच 15 दिवसांपर्यंत दीर्घकाळ बॅटरी लाइफ देते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही वॉच पारंपारिक Smartwatch पेक्षा चार पट जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊयात boAt Storm Infinity ची किंमत आणि इतर तपशील-
Also Read: Realme P3 5G ची सेल आजपासून होणार सुरु! स्वस्त फोनवर थेट 2000 रुपयांची सूट, पहा किंमत
boAt Storm Infinity ची किंमत
boAt Storm Infinity स्मार्टवॉचची किंमत 1299 रुपये इतकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लाँच ऑफरअंतर्गत 100 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जाणार आहे. ही स्मार्टवॉच अॅक्टिव्ह ब्लॅक, चेरी ब्लॉसम, ब्राउन, डीप ब्लू, जेड गोल्ड, सिल्व्हर मिस्ट, स्पोर्ट्स ब्लॅक आणि स्पोर्ट्स अशा अनेक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, boAt Storm Infinity वॉच Amazon, Flipkart, boAt वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदीसाठी उपलब्ध असेल.
boAt Storm Infinity चे फीचर्स आणि स्पेक्स
boAt स्मार्टवॉचमध्ये 1.83-इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला Wake Gesture फिचर मिळेल, ज्याच्या मदतीने, तुम्ही फक्त तुमचे मनगट फिरवून स्क्रीनवर काय आहे ते सहज पाहू शकता. ही स्मार्टवॉच ब्लूटूथद्वारे कनेक्ट होईल, त्यात ऍडव्हान्स ब्लूटूथ कॉलिंग फीचर आहे. यात एक इंटरॅक्टिव्ह डायल पॅड आहे, त्यामुळे तुम्ही फक्त एका टॅपने कॉल करण्यास सक्षम असाल. वर सांगितल्याप्रमाणे, जे 15+ दिवस टिकेल, असा दावा केला जातो. हे ‘ASAP फास्ट चार्जिंग’ ला सपोर्ट करते, ज्यामुळे स्मार्टवॉच फक्त 60 मिनिटांत 100% पर्यंत चार्ज होऊ शकते.
तसेच, या वॉचला IP68 रेटिंग मिळाली आहे, जी धूळ, घाम आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आहे. यात, आपत्कालीन SOS अलर्ट सिस्टम, हरवलेले स्मार्टवॉच सहज शोधण्यासाठी Find My Device फिचर देखील आहे. तसेच, यात इन-बिल्ट व्हॉइस असिस्टंट, नोटिफिकेशन अलर्ट आणि क्विक रिप्लायसाठी सपोर्ट प्रदान केला आहे. एवढेच नाही तर, अलार्म, स्टॉपवॉच, वेदर अपडेट, फ्लॅशलाइट, म्युझिक आणि कॅमेरा नियंत्रण देखील आहे.
हेल्थ फीचर्स
boAt च्या या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर्स, झोप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग, मासिक पाळी ट्रॅकिंग, ब्रीडिंग एक्सरसाइज, 100+ स्पोर्ट्स मोड्स, स्टेप काउंटर आणि कॅलरी बर्न ट्रॅकर आहेत. याशिवाय, तुमच्या हेल्थसाठी रिमाइंडर्स लावण्याची देखील सुविधा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile