भारीच की! boAt Smart Ring ची सेल सुरु, जाणून घ्या किमंत, ऑफर्स आणि सर्व विशेषता

भारीच की! boAt Smart Ring ची सेल सुरु, जाणून घ्या किमंत, ऑफर्स आणि सर्व विशेषता
HIGHLIGHTS

भारतात boAt Smart Ring ची किंमत फक्त 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

ICICI आणि HDFC कार्डच्या मदतीने Amazon वर 7.5% सूट

डिवाइस एका चार्जवर 7 दिवसांचा बॅकअप देईल, असा कंपनीचा दावा

भारतीय स्मार्ट गॅझेट्स निर्माता कंपनी boAt ने गेल्या महिन्यात भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन boAt स्मार्ट रिंगची घोषणा केली. आता या नवीन आणि अनोख्या वेअरेबल डिवाइसची विक्री सुरू झाली आहे. या छोट्याशा डिवाइ द्वारे तुम्हाला तुमच्या आरोग्यावर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. हे उपकरण तीन आकारात आणले गेले आहे, ज्यात 17.40 मिमी, 19.15 मिमी आणि 20.85 मिमी समाविष्ट आहे. स्मार्ट रिंग फक्त मेटॅलिक सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये ऑफर केली गेली होते. चला तर मग स्मार्ट रिंगच्या सेलबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात. 

boAt Smart Ring ची किंमत आणि ऑफर्स 

boat smart ring

भारतात boAt Smart Ring ची किंमत फक्त 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्याची विक्री 28 ऑगस्टपासून Amazon आणि Flipkart वर सुरू झाली आहे. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास,  रिंगवर बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. ग्राहक ICICI आणि HDFC कार्डच्या मदतीने Amazon वर 7.5% सूट घेऊ शकतात. येस बँकेचे ग्राहक Amazon वर EMI द्वारे 500 रुपयांची सूट घेऊ शकतात. लक्षात घ्या की, या दोन्ही बँक ऑफर फक्त Amazon वर उपलब्ध आहेत.

boAt Smart Ring 

वर सांगितल्याप्रमाणे, boAt ने सादर केलेल्या या स्मार्ट रिंगच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या आरोग्याच्या सर्व बाबींवर लक्ष ठेऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आणि इतर क्रियाकलापांचा मागोवा घेऊ शकतात. फीचर्सबद्दल सविस्तरपणे बोलायचे झाल्यास, युजर्सना डिव्हाइसमध्ये स्टेप काउंट, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटरिंगची सुविधा दिली जात आहे. यामध्ये रक्तातील ऑक्सिजन लेव्हल, स्लिप ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग यांसारखे महत्त्वाचे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या डिव्हाईसमध्ये 20 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी सहज ट्रॅक करू शकता.

boat smart ring

विशेष म्हणजे, हे डिव्हाईस 5ATM वॉटर रेसिस्टंट देखील आहे, म्हणजेच तुम्ही ते पाण्यात देखील वापरू शकता. यासह म्युझिक कंट्रोल करता येते. फोन कनेक्ट करून कॅमेरा पिक्चर्स देखील काढता येतील. याशिवाय, वापरकर्ते boAt स्मार्ट रिंग कंपनीच्या ऍपशी कनेक्ट करून त्यांचा सर्व ट्रॅकिंग डेटा सहज बघू शकता. बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले, तर डिवाइस एका चार्जवर 7 दिवसांचा बॅकअप देईल, असा कंपनीचा दावा आहे. मात्र लक्षात घ्या की, त्याचा बॅकअप वापरकर्त्यांच्या वापरामुळे कमी किंवा जास्त होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo