Best Smartwatches Under 3000: प्रीमियम लूकसह कमी किमतीत सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच, पहा यादी

Best Smartwatches Under 3000: प्रीमियम लूकसह कमी किमतीत सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच, पहा यादी
HIGHLIGHTS

कंपन्यांनी ग्राहकांच्या सर्व गरजा लक्षात घेता अनेक स्मार्टवॉचेस बाजारात उपलब्ध करून दिले.

स्मार्टवॉचेसमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर आणि व्हॉईस असिस्टंट यांसारखे ऍडव्हान्स फीचर्स मिळतील.

3000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या बेस्ट स्मार्टवॉचेसबद्दल माहिती देणार आहोत.

Best Smartwatches Under 3000: तरुणाईमध्ये तसेच आरोग्याच्या निरीक्षणासाठी सज्ज असलेल्या स्मार्टवॉचेसबद्दल सर्वांचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. कंपन्यांनी ग्राहकांच्या या सर्व गरजा लक्षात घेता अनेक स्मार्टवॉचेस बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. या सर्वांमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर आणि व्हॉईस असिस्टंट यांसारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 3000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या बेस्ट स्मार्टवॉचेसबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: अखेर पॉवरफुल आणि बहुप्रतिक्षीत गेमिंग फोन iQOO 13 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Noise ColorFit Ultra 3

Noise Colorfit Ultra 3 स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. या स्मार्टवॉचला मेटॅलिक फिनिश देण्यात आले आहे. या वॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग फंक्शन देण्यात आले आहे. यामध्ये हार्ट-रेट ट्रॅकर तसेच अनेक स्पोर्ट्स मोड, ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि 1.96-इंचाचा AMOLED डिस्प्ले यासारखी आरोग्य फीचर्स उपलब्ध आहेत. हे ॲमेझॉनवर अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Best Smartwatches Under 3000

Fastrack Limitless Fs2 Pro

Fastrack Limitless Fs2 Pro ही स्मार्टवॉच Amazon India वर 2,450 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. या वॉचमध्ये 1.96 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर, ब्लूटूथ कॉलिंग, 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 200 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत. या वॉचमध्ये इनबिल्ट गेम आणि व्हॉइस असिस्टंटसाठी सपोर्ट आहे. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Fire-Boltt Maverick

Fire-Boltt Maverick ही अगदी प्रीमियम लुकसह येणारी स्मार्टवॉच आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, 2.02 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग, व्हॉईस असिस्टंट, स्पोर्ट्स मोड आणि हार्ट-रेट मॉनिटरिंगची सुविधा आहे. त्याची किंमत 1,999 रुपये आहे. ही स्मार्टवॉच Amazon वरून अनेक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केले जाऊ शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo