आजकल तरुणाईमध्ये Smartwatches चे ट्रेंड वाढत चालले आहे. एवढेच नाही तर, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा स्मार्टवॉचेसचे क्रेझ वाढताना दिसत आहे. आजकाल तुम्हाला मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या हातात स्मार्टवॉचेस, फिटनेस बँड्स अशी उपकरणे दिसत असतील. तसेच, मुलांसाठी स्मार्टवॉचेस पालकांसाठी त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित आणि मजेदार साधन असू शकते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला मुलांसाठी स्मार्टवॉचेसचे फायदे नुकसान आणि सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत.
Also Read: boAt चे अप्रतिम स्मार्टवॉचेस Myntra वर भारी सवलतींसह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी
स्मार्टवॉचमध्ये GPS, रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग आणि SOS तंत्रज्ञानाचा समावेश असतो. जेणेकरुन मुलाला कुठल्याही प्रकारचा धोका जाणवल्यास ते पालकांना सहज सावध करू शकतात.
स्मार्टवॉचेस तुमच्या मुलांचे हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर, स्लीप आणि स्टेप्स ट्रॅक करू शकतात. हे फीचर्स तुमच्या मुलांना व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी फिटनेस मोड आणि गेम देखील समाविष्ट करू शकतात. जेणेकरून तुमच्या मुलाला लहान वयातच फिटनेससाठी मार्गदर्शन मिळेल.
आपण सर्वांना माहितीच आहे की, स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फिचर उपलब्ध असते. विशेषतः लहान मुलांसाठी येणाऱ्या स्मार्टवॉचेसमध्ये व्हिडीओ आणि व्हॉइस कॉलिंग फीचर्स तसेच टेक्स्ट मेसेजिंगचा समावेश असतो. यासह तुमची मळे अडचणी वेळी तुमच्याशी या उपकरणाद्वारे संवाद साधू शकतात.
Gabb Watch 3, Cosmo JrTrack 3 Kids Smart Watch, Apple Watch SE, Garmin Bounce, Gizmowatch 3, Xplora XGO3, Noise Champ 2 Kids Smart Watch, Fitbit Ace 3 Activity Tracker for Kids, Spacetalk Adventurer इ. स्मार्टवॉचेस भारतात लहान मुलांसाठी अप्रतिम पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या सर्व स्मार्टवॉचेसमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वरील सर्व बेनिफिट्स मिळतील. एवढेच नाही तर, या डिव्हाइसेसद्वारे तुम्हाला चांगले पॅरेंटल कंट्रोल, प्रायमरी स्कुल्ससाठी चांगले, मोठ्या मुलांसाठी चांगले आणि फोन-कॉल आणि टेक्स्ट मॅसेज क्षमता, ऍक्टिव्ह मुलांसाठी चांगले आणि रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, इ. अनेक अप्रतिम बेनिफिट्स मिळणार आहेत.