Apple ने आपली नवीन स्मार्टवॉच सीरीज Watch series 8 लाँच केली आहे. Apple Watch Series 8, Apple Watch SE, Apple Watch Ultra हे तीन स्मार्टवॉच कंपनीच्या नवीन सिरीजमध्ये दाखल झाले आहेत. कंपनीच्या नवीनतम स्मार्टवॉचच्या GPS मॉडेलची सुरुवातीची किंमत $399 आहे. तर, कंपनीने सेल्युलर व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत $ 499 ठेवली आहे. ही वॉच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यांची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवीन स्मार्टवॉचसह, कंपनीने आजच्या कार्यक्रमात त्यांचे नवीन AirPods Pro 2 देखील लॉन्च केले आहे. AirPods Pro 2 ची किंमत $249 आहे. त्यांची प्री-ऑर्डर 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ते 23 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील.
हे सुद्धा वाचा : अखेर प्रतीक्षा संपली ! Apple iPhone 14 सीरीजची जबरदस्त एंट्री, शानदार फीचर्ससह कंपनीचे नवे फोन लाँच
Apple Watch Series 8 ही दिसायला वॉच सिरीज 7 सारखीच आहे. कंपनी नवीन वॉच अनेक डेव्हलप फीचर्ससह देत आहे. यामध्ये तुम्हाला बिल्ट-इन टेंपरेचर सेन्सरसह हेल्थ ट्रॅकिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यासोबतच ते महिलांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतात. कंपनी ऍडव्हान्स क्रॅश डिटेक्शन नावाचे एक नवीन प्रोटेक्शन फीचर देखील देत आहे. हे फिचर धोकादायक क्रॅश झाल्यास संबंधित अथॉरिटीला अलर्ट पाठवेल जेणेकरुन वेळेत वापरकर्त्याचा जीव वाचू शकतो. वॉचमधील बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ते 18 तास टिकते असा कंपनीचा दावा आहे.
या वॉचमध्ये 49mm डिस्प्ले आहे आणि ती टायटॅनियम बॉडीसह येते. स्मार्टवॉचच्या मोठ्या स्क्रीनसाठी यामध्ये नवीन वेफाइंडर वॉच फेस देण्यात आला आहे. यामध्ये कंपनी नवीन ऍक्शन बटण देत आहे. त्याच्या मदतीने, वॉचमध्ये विविध फंक्शन ऍक्टिव्ह केली जाऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, या उपकरणातील बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 36 तासांपर्यंत चालते. त्याच वेळी, कमी पॉवर सेटिंगमध्ये बॅटरी 60 तास आरामात टिकते. या वॉचची GPS ऍक्युरेसी देखील अगदी अचूक आहे.
नवीन Apple Watch SE ही मागील Apple Watch SE चे अपडेटेड वर्जन आहे. यामध्ये कंपनी क्रॅश डिटेक्शन फीचर देखील देत आहे. नवीन S8 चिपसेटमुळे ही वॉच मागील व्हेरियंटपेक्षा 20% वेगाने काम करते. डिव्हाइसमध्ये तुम्हाला रेटिना OLED डिस्प्ले, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, इमर्जन्सी SOS, फॉल डिटेक्शन इ. मिळेल. नवीन Apple Watch SE सिल्व्हर, मिडनाईट आणि स्टारलिट कलरमध्ये येते.
कंपनीचे नवीन AirPods नवीनतम H2 चिपसेटने सुसज्ज आहेत. हा चिपसेट पॉड्सची ऑडिओ क्वालिटी अत्यंत उत्तम बनवतो. यामध्ये, कंपनी सुधारित मायक्रोफोनसह चांगले नॉइज कॅसिलेशन ऑफर करत आहे. ऍडॉप्टीव ट्रान्स्परन्सी फिचर रिअल टाइममध्ये जास्त आवाज कमी करतो. नवीन टच कंट्रोल्ससह म्युझिक प्लेबॅक आणि कॉलिंगचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा खूपच चांगला आहे. बॅटरी एका चार्जवर 6 तास टिकते, असा कंपनीचा दावा आहे.