आता अॅप्पल वॉचची सुरुवातीची किंमत जवळपास २०,५०० रुपये (299 डॉलर) पासून होईल. आधी अॅप्पल वॉचची किंमत जवळपास २३,२०० रुपये(349 डॉलर) होती.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने सोमवारी सेन फ्रांन्सिस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमाता आपला नवीन आयफोन SE आणि आयपॅड प्रो लाँच केले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अॅप्पल वॉचच्या किंमतीतही घट केल्याची घोषणा केली.
आता अॅप्पल वॉचची सुरुवातीची किंमत जवळपास २०,५०० रुपये (299 डॉलर) पासून होईल. आधी अॅप्पल वॉचची किंमत जवळपास २३,२०० रुपये(349 डॉलर) होती.
त्याशिवाय ह्या इव्हेंटमध्ये कंपनीने अॅप्पल वॉचच्या नवीन बँडलासुद्धा लाँच केले. अॅप्पल वॉच यूजरसाठी कंपनीने बरेच अॅप्पल वॉच स्पोर्ट्स बँड आणि लेदर बँड्स लाँच केले. हे बँड अनेक रंगात मिळतील. त्याशिवाय अॅप्पलने नवन वूवन नायलॉन बँडसुद्धा लाँच केले. हे बँड चार लेयरमध्ये बनले आहेत. ह्याची किंमत ४९ डॉलर ठेवली आहे. अॅप्पलने एक स्पेस-ब्लॅक मिलानीज लूपसुद्धा लाँच केला, ज्याची किंमत १९९ डॉलर आहे. हा सिल्वर मिलानीज लूपपेक्षा ५० डॉलर जास्त महाग आहेत.
भारतात उपलब्ध असलेल्या अॅप्पल वॉचमध्ये वॉच ओएस 2 प्री-लोडेड आहे. तर वॉच अॅप स्टोरवर सध्यातरी १३०० अॅप्स उपलब्ध आहे. IOS ऑपरेटिंगवर आधारित ह्या अॅप्पल वॉचला कोणत्याही आयफोनसह अगदी सहजपणे कनेक्ट करु शकतो.