भारतात ६ नोव्हेंबरला लाँच होणार अॅप्पल वॉच

Updated on 29-Oct-2015
HIGHLIGHTS

अॅप्पल वॉचला सर्वात आधी एप्रिल महिन्यात अमेरिका, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंग्डममध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता हळूृहळू हा इतर देशात सादर केला जातोय.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पल आपल्या स्मार्टवॉचला भारतात ६ नोव्हेंबरला लाँच करेल. ही माहिती अॅप्पलने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. आणि आता तर ह्याच्या किंमतीबाबतही खुलासा केला आहे.

 

अॅप्पल वॉच स्पोर्टच्या ३८एमएमची किंमत ३०,९०० रुपयांपासून सुरु होईल. तर त्याच्या ४२एमएमच्या स्मार्टवॉचची किंमत ३४,९०० रुपये आहे. ह्या दोघांच्या किंमती सर्व टॅक्स समाविष्ट करुन आहे. अमेरिकेमध्ये 38mm आणि 42mm मॉडेलची किंमत क्रमश: ३४९ डॉलर(२२,७०० रुपये) आणि ३९९ डॉलर(२५,९०० रुपये) इतकी आहे.

ही माहिती गॅजेट्स३६० च्या अहवालानुसार मिळाली आहे. त्याचबरोबर वेबसाइटनेसुद्धा अशी माहिती दिली आहे की, भारतामध्ये आपले सर्व स्मार्टवॉच लाँच करण्याची अॅप्पलची योजना आहे. ह्या डिवाइसची किंमत १७,००० डॉलर(जवळपास ११ लाख रुपये) आहे. वॉचच्या ब्रँडचे सर्व रेंज भारतात सादर केले जातील, ज्याची किंमत ३,९०० पासून सुरु होईल. अॅप्पल वॉच (स्टेनलेस स्टील केज)ची भारतात किंमत ४८,९०० आणि ९५,९०० रुपये ह्या दरम्यान असेल.

अॅप्पल वॉचला सर्वात आधी एप्रिल महिन्यात अमेरिका, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंग्डममध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता हळूृहळू हा इतर देशात सादर केला जातोय.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :