सुप्रसिद्ध टेक जायंट Apple ने भारतात ‘Apple Watch for Kids’ लाँचची घोषणा केली आहे. या स्मार्टवॉचमुळे पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवता येईल. या नवीन लाँचसह कंपनीने Apple Watch ची कार्यक्षमता आणि सुरक्षा फीचर्स वाढवली आहेत. Apple Watch SE आणि Apple Watch Series 4 आणि त्या पुढील वर्जन्सवर उपलब्ध हे फिचर पालकांना त्यांच्या मुलांशी स्वतंत्रपणे जोडलेले राहण्यास मदत करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात फीचर्स-
Also Read: आकर्षक आणि लोकप्रिय iPhone 15 भारी Discount सह खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या बेस्ट ऑफर
ही स्मार्टवॉच विशेषतः लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. या वॉचद्वारे पालक आपल्या मुलांवर उत्तमरित्या लक्ष ठेवण्यास आणि क्षणोक्षणी त्यांच्यासोबत कनेक्ट राहण्यास सक्षम असतील. या स्मार्टवॉचमध्ये अनेक विशेष फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
पालक त्यांचा स्वतःचा iPhone आणि वेगळा सेल्युलर प्लॅन वापरून त्यांच्या मुलांचे Apple Watch सेट करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मुलाकडे स्वतःचा Apple ID असेल, ज्याच्या मदतीने ते पालकांच्या iPhone वरून सिंक केलेले फोटो अल्बम, कॅलेंडर आणि रिमाइंडर्स यासारखे फीचर्स ऍक्सेस करण्यास सक्षम असतील.
लक्षात घ्या की, Apple Watch for Kids’ भारतात ‘Apple Watch Series 4’ सह किंवा त्या पुढील मॉडेल्स आणि सेल्युलर मॉडेल्ससह उपलब्ध आहे. त्याच्या प्रारंभिक सेटअप प्रक्रियेसाठी एक सुसंगत iPhone म्हणजेच iPhone 6s किंवा नंतरचे मॉडेल आवश्यक असेल. त्याबरोबरच, महत्त्वाचे म्हणजे Apple वॉचवर सेल्युलर ऍक्टिव्हिटीसाठी सपोर्टेड कॅरियर म्हणेजच Jio च्या वायरलेस सर्व्हिस प्लॅनची गरज आहे.