Apple Watch for Kids: भारतात लहान मुलांसाठी नवीन स्मार्टवॉच लाँच, पालकांची होईल मोठी मदत 

Apple Watch for Kids: भारतात लहान मुलांसाठी नवीन स्मार्टवॉच लाँच, पालकांची होईल मोठी मदत 
HIGHLIGHTS

Apple च्या 'Apple Watch for Kids' भारतीय लाँचची घोषणा

नवीन लाँचसह कंपनीने Apple Watch ची कार्यक्षमता आणि सुरक्षा फीचर्स वाढवली.

या वॉचद्वारे पालक आपल्या मुलांवर उत्तमरित्या लक्ष ठेवण्यास सक्षम असतील.

सुप्रसिद्ध टेक जायंट Apple ने भारतात ‘Apple Watch for Kids’ लाँचची घोषणा केली आहे. या स्मार्टवॉचमुळे पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवता येईल. या नवीन लाँचसह कंपनीने Apple Watch ची कार्यक्षमता आणि सुरक्षा फीचर्स वाढवली आहेत. Apple Watch SE आणि Apple Watch Series 4 आणि त्या पुढील वर्जन्सवर उपलब्ध हे फिचर पालकांना त्यांच्या मुलांशी स्वतंत्रपणे जोडलेले राहण्यास मदत करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात फीचर्स-

Also Read: आकर्षक आणि लोकप्रिय iPhone 15 भारी Discount सह खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या बेस्ट ऑफर

Apple Watch for Kids च्या विशेषता

ही स्मार्टवॉच विशेषतः लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. या वॉचद्वारे पालक आपल्या मुलांवर उत्तमरित्या लक्ष ठेवण्यास आणि क्षणोक्षणी त्यांच्यासोबत कनेक्ट राहण्यास सक्षम असतील. या स्मार्टवॉचमध्ये अनेक विशेष फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

  • मुलं त्यांच्या पालकांनी अप्रूव्ह केलेल्या संपर्कांशी कॉल किंवा संदेश प्राप्त करू शकतात.
  • पर्सनलाइज्ड ऍक्टिव्हिटी गोल सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देतात. तर इमर्जन्सी SOS सारखी आरोग्य फीचर्स मनःशांती देतात.
  • लोकेशन ट्रॅकिंग: पालक Find People ॲपद्वारे त्यांच्या मुलांचे लोकेशन ट्रॅक करू शकतात.
  • ॲप स्टोअर ॲक्सेस: मुले ॲप स्टोअरवरून थेट त्यांच्या Apple वॉचवर डाउनलोड केलेल्या वयानुसार ॲप्सचा लाभ घेऊ शकतात, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी पालक नियंत्रण देखील उपलब्ध आहे.
  • स्कूलटाइम मोड: स्कूलटाइम मोडमध्ये शाळेच्या वेळेत ऍप ऍक्सेस थांबतो आणि ‘Do Not Disturb’ अनेबल झाल्यावर मुलांच्या अभ्यासात अडथडा येत नाही.
Apple ने भारतात 'Apple Watch for Kids' लाँच करण्याची घोषणा केली.

पालकांना नियंत्रण ठेवता येईल.

  • काँटॅक्ट अप्रूव्हल: मुले कोणाशी संपर्क साधू शकतात यावर पालकांचे पूर्ण नियंत्रण असेल.
  • कंटेंट रेस्ट्रिक्शन: पालक ॲप डाउनलोड मॅनेज करू शकतात आणि ‘कंटेंट रेस्ट्रिक्शन’ आणि ‘आस्क टू बाय’ फिचरद्वारे मर्यादा सेट करू शकतात.
  • हेल्थ डेटा शेयरिंग: पालक त्यांच्या मुलाचा हेल्थ आणि फिटनेस डेटा त्यांच्या iPhone वर Health ॲपद्वारे पाहू शकतात.

या स्मार्टवॉचचा वापर कसा करावा?

पालक त्यांचा स्वतःचा iPhone आणि वेगळा सेल्युलर प्लॅन वापरून त्यांच्या मुलांचे Apple Watch सेट करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मुलाकडे स्वतःचा Apple ID असेल, ज्याच्या मदतीने ते पालकांच्या iPhone वरून सिंक केलेले फोटो अल्बम, कॅलेंडर आणि रिमाइंडर्स यासारखे फीचर्स ऍक्सेस करण्यास सक्षम असतील.

लक्षात घ्या की, Apple Watch for Kids’ भारतात ‘Apple Watch Series 4’ सह किंवा त्या पुढील मॉडेल्स आणि सेल्युलर मॉडेल्ससह उपलब्ध आहे. त्याच्या प्रारंभिक सेटअप प्रक्रियेसाठी एक सुसंगत iPhone म्हणजेच iPhone 6s किंवा नंतरचे मॉडेल आवश्यक असेल. त्याबरोबरच, महत्त्वाचे म्हणजे Apple वॉचवर सेल्युलर ऍक्टिव्हिटीसाठी सपोर्टेड कॅरियर म्हणेजच Jio च्या वायरलेस सर्व्हिस प्लॅनची गरज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo