Apple इव्हेंट 2023 Wonderlust लेटेस्ट iPhone 15 सिरीजसह Apple Watch Series 9, Watch SE आणि Watch Ultra 2 स्मार्टवॉच देखील लाँच करण्यात आले आहेत. या तिन्ही स्मार्टवॉचचे डिझाईन आणि लूक कंपनीच्या जुन्या स्मार्टवॉचप्रमाणेच आहे. या तिन्ही स्मार्टवॉचमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी S9 चिप आहे. याशिवाय नवीन स्मार्टवॉचमध्ये स्पोर्ट्स मोड आणि हेल्थ यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. बघुयात लेटेस्ट Apple स्मार्टवॉचेसच्या किमती.
Apple चे नवीन स्मार्टवॉच भारतीय बाजारपेठेत Samsung सारख्या ब्रँडच्या प्रीमियम स्मार्टवॉचला जोरदार स्पर्धा देईल, अशी चर्चा टेक विश्वात सुरु झाली आहे.
Apple Watch Series 9 च्या GPS व्हेरिएंटची किंमत 41,900 रुपये आहे. तर त्याचे सेल्युलर मॉडेल 70,900 रुपयांना उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Watch SE च्या GPS आणि सेल्युलरची किंमत अनुक्रमे 29,900 आणि 34,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, Watch Ultra 2 स्मार्टवॉच 89,900 रुपयांना उपलब्ध आहे. लेटेस्ट स्मार्टवॉचेसची विक्री 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
Apple Watch Series 9 मध्ये मोठा कर्व डिस्प्ले आहे. जुन्या Apple Watch Series 8 च्या तुलनेत ही वॉच 25% अचूक आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वॉचमध्ये S9 चिप वापरण्यात आली आहे. Apple ची नवीन वॉच सीरीज 9 डबल टॅप फीचरने सुसज्ज आहे. या फीचरच्या मदतीने वॉचमध्ये म्युझिक थांबवणे, वॉच फेस बदलणे आणि विजेट्स बदलणे यासारखी कामे करता येतील. याशिवाय, याद्वारे कॉल्स देखील मॅनेज करता येतील. स्मार्टवॉचची बॅटरी फुल चार्ज केल्यावर 80 तास टिकेल. Apple Watch Series 9 मध्ये व्हॉईस असिस्टंट Siri चा सपोर्ट आहे.
हे Apple चे सर्वात पावरफुल स्मार्टवॉच आहे. यामध्ये एक मोठा डिस्प्ले आहे, जो 3000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचमध्ये GPS सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये S9 चिप आणि डबल टॅप फीचर आहे. विशेष म्हणजे ही स्मार्टवॉच 40 मीटर पर्यंत पाण्यात वापरता येते. स्वीमर्ससाठी ही स्मार्टवॉच परफेक्ट आहे.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, नॉर्मल युसेजवर 36 तासांचा बॅटरी बॅकअप देते. तर, पॉवर मोडमध्ये ते 72 तासांचा प्ले-बॅक टाइम देते. त्याबरोबरच, फ्लॅश लाईट बूस्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही डिजिटल क्राउन फिरवून डार्कमध्ये फ्लॅशलाइटची चमक तात्पुरती दुप्पट करू शकता.