Ambrane ने लाँच केले कमी किमतीचे कॉलिंग स्मार्टवॉच, तब्बल 25 दिवस चालेल बॅटरी

Ambrane ने लाँच केले कमी किमतीचे कॉलिंग स्मार्टवॉच, तब्बल 25 दिवस चालेल बॅटरी
HIGHLIGHTS

Ambrane Wise Eon Pro नवीन स्मार्टवॉच लाँच

कॉलिंग फीचरसह मिळतील अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स

विशेष लाँच ऑफरअंतर्गत ही वॉच 1,799 रुपयांच्या किमतीत उपलब्ध

अ‍ॅक्सेसरीज निर्माता कंपनी Ambrane ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Ambrane Wise Eon Pro लाँच केले आहे. ही वॉच 2 हजारांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आली आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगसह ब्राइट डिस्प्ले समर्थित आहे. वॉचसह 100+ वॉच फेस आणि 100+ स्पोर्ट्स मोडसाठी समर्थन आहे. चला जाणून घेऊया स्मार्टवॉचचे इतर फीचर्स आणि किंमत…

हे सुद्धा वाचा : JIO वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी ! Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅन्स बंद

Ambrane Wise Eon Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्मार्टवॉचमध्ये मोठा 1.85-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो LucidDisplayTM डिस्प्ले आणि 240×280 रिझोल्यूशन सपोर्टसह येतो. डिस्प्लेसह 550 निट्सची ब्राइटनेस उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, वॉचमध्ये 25 टक्के ब्राईट डिस्प्ले आणि हाय व्हिजिबिलिटी मिळते. वॉचमध्ये स्क्रॅच-प्रतिरोधक 2.5D ग्लास देखील मिळतो. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगसह इंटरॅक्टिव्ह डायल, लाईव्ह वॉच फेसेस, कस्टमाइजेबल विजेट आणि पर्सनलायजेशनचा सपोर्ट आहे. 

Ambrane Wise Eon Pro मध्ये ब्लड ऑक्सिजन (SpO2), स्लिप, हार्ट रेट आणि वूमन हेल्थ ट्रॅकिंग सारखे सेन्सर मिळतात. ही वॉच 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि रनिंग, वॉकिंग यासारख्या 100 हून अधिक स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते.

वॉचसोबत 280mAh बॅटरी उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर वॉचला 10 दिवसांची बॅटरी लाइफ आणि 25 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी वॉचमध्ये ब्लूटूथ v5.0 सपोर्ट आहे. वॉटर रेसिस्टंटसाठी यामध्ये IP68 रेटिंग देखील आहे.

Ambrane Wise Eon Pro ची किंमत 

 लेटेस्ट स्मार्टवॉचची किंमत 5,999 रुपये आहे, परंतु विशेष लॉन्च ऑफर अंतर्गत ही वॉच 1,799 रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. Ambrane Wise Eon Pro कंपनीच्या वेबसाइट आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo