विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मिळून आता बरीच प्रगती केली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपकरणं निघाली आहेत. आत्तापर्यंत, स्मार्टबँड्स आणि स्मार्टवॉच हे तुमचे हार्ट बिट आणि स्लीपिंग ट्रॅक करण्याचे काम करत आले आहेत. त्याबरोबरच, फोनमधील आरोग्यासंबंधित काही ऍप्सदेखील हे काम करतात. पण एक अंगठी देखील हे काम करू शकते असे सांगितले तर? होय, लक्झरी फॅशन ब्रँड Gucci आणि फिनलंडची हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी Oura यांनी अल्ट्रा-प्रिमियम स्मार्ट रिंग तयार केली आहे. यात स्मार्टवॉचची सर्व वैशिष्ट्ये आहेत.
खरं तर ही स्मार्टरिंग फक्त तुमचे हार्ट बिट आणि स्लिप ट्रॅक करणार नाही तर तुमच्या तापावरही लक्ष ठेवणार आहे. जर तुम्हाला या अंगठीची किंमत जाणून घ्यायची इच्छा असेल तर, याची किंमत $950 म्हणजेच सुमारे 74 हजार रुपये आहे. चला तर जाणून घेऊयात स्मार्टरिंग बद्दल सर्व तपशील…
हे सुद्धा वाचा : Airtel vs VI रिचार्ज प्लॅन: दररोज 2GB डेटासह कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?
या अंगठीला आकर्षक आणि आलिशान डिझाइन देण्यात आले आहे. हे PVD-कोटेड टायटॅनियमचे बनलेले आहे, यावर अनेक ठिकाणी गुच्चीचे सिग्नीचर मोनोग्राम आहे. रिंगच्या कडेला 18 कॅरेट सोन्याचे डिझाइन आहे. रिंग 100 मीटर पर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे, रिंगची जाडी 7.6 मिमी आहे. रिंगच्या आतील बाजूस सेन्सर्स लागलेले आहेत.
या रिंगमध्ये एका स्मार्टवॉचची सर्व आरोग्य वैशिष्ट्ये आहेत. ही रिंग 24/7 हृदय गती निरीक्षण, तापमान सेन्सर, SpO2 सेन्सिंग आणि झोपेचे विश्लेषण यासारख्या वैशिष्ट्यांसह येते. हे उपकरण झोप, ऍक्टिव्हिटी आणि तत्परतेच्या आधारावर हेल्थ ऍनालिसिस करते.
रिंगमध्ये 4 ते 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आहे. ही रिंग ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन आणि इतर उपकरणांशी कनेक्ट केली जाऊ शकते. यात टाइप-सी पोर्टसह गुच्ची ब्रँडचा चार्जर आहे. शिवाय, यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट्सही मिळतील.