Amazfit ने या महिन्याच्या सुरुवातीला बँड 7 सादर केला. त्यांनतर, आता कंपनीने आपले नवीन स्मार्टवॉच Amazfit POP 2 भारतात लाँच केले आहे. हे उपकरण गेल्या आठवड्यात ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले होते. ही स्मार्टवॉच बजेट कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आली आहे. Amazfit POP 2 ची किंमत 4 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. Noise, Realme आणि Oneplus इ. दुसऱ्या बजेट सेगमेंटमधील स्मार्टवॉचसोबत या वॉचची स्पर्धा असेल.
हे सुद्धा वाचा : सध्या का बरं चर्चेत आहे Bumble Dating App ? कसे कार्य करतो, जाणून घ्या सर्व काही…
Amazfit POP 2 ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, ते रु. 3,299 च्या प्रास्ताविक किमतीत खरेदी करता येईल. त्याची विक्री 22 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट आणि ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरून सुरू होईल. ही वॉच तुम्ही ब्लॅक किंवा पिंक कलरमध्ये खरेदी करू शकता.
Amazfit POP 2 मध्ये स्क्वेअर डायल देण्यात आला आहे. यात 1.78-इंच लांबीची AMOLED स्क्रीन आहे. हे हाय रिझोल्यूशन सपोर्टसह येते. कंपनीने यामध्ये ऑलवेज-ऑन-डिस्प्ले देखील दिला आहे. ही स्मार्टवॉच 150 हून अधिक कस्टमायजेबल स्मार्टवॉच सह येते. या स्मार्टवॉचमध्ये ऍल्युमिनियम अलॉय बॉडी देण्यात आली आहे. त्याच्या उजव्या बाजूला एक बटण देण्यात आले आहे. त्याबरोबरच, ही स्मार्टवॉच 5 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टंट असल्याचे कंपनीचा दावा करण्यात आला आहे.
आरोग्याशी संबंधित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazfit POP 2 मध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, सेडेंटरी रिमाइंडर आणि इतर फीचर्स आहेत. तसेच, हे स्मार्टवॉच 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड ट्रॅक करू शकते. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. यासाठी बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोनचा सपोर्टही यामध्ये देण्यात आला आहे. यामध्ये इंटिग्रेटेड व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट आहे.
वापरकर्ते स्मार्टवॉचमधूनच म्युझिक प्लेबॅक आणि कॅमेरा शटर कंट्रोल करू शकतात. यात सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, वेदर अपडेट्स, कॅलेंडर रिमाइंडर्स आणि इतर फीचर्स देखील आहेत. यामध्ये दिलेली 270mAh बॅटरी 10 दिवस टिकते असा कंपनीचा दावा आहे.