Amazfit ने आपले नवीन स्मार्टवॉच Amazfit Zepp E भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीचे नवीन स्मार्टवॉच वर्तुळाकार आणि चौरस अशा दोन डिस्प्ले डिझाइनमध्ये आले आहे. नवीन वॉचमध्ये, तुम्हाला ऑल्वेज-ऑन-डिस्प्ले आणि AMOLED स्क्रीन पाहायला मिळेल. आरोग्य आणि फिटनेससाठी, यात 24×7 हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरसह एकाधिक स्पोर्ट्स मोड दिले गेले आहेत. 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 8,999 रुपये आहे. Amazfit च्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्हाला ही वॉच Amazon India वरून देखील खरेदी करता येईल.
स्मार्टवॉचच्या सर्क्युलर व्हेरिएंटमध्ये 348×442 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.28-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. दुसरीकडे, स्मार्टवॉचच्या चौरस मॉडेलमध्ये, तुम्हाला 1.65-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. कंपनीने दोन्ही वॉचमध्ये ऑल्वेज-ऑन-डिस्प्ले फिचर दिला आहे. स्मार्टवॉचचे डिझाईन खूपच प्रीमियम आणि बेझललेस आहे. त्याबरोबरच यात 3D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन देखील आहे. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : Jioच्या ग्राहकांना मोठा झटका ! रिचार्ज प्लॅन्स 20% पर्यंत महागले, बघा यादी
हेल्थ आणि फिटनेससाठी तुम्हाला वॉचमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी SpO2 सेन्सरसह 24×7 हार्ट रेट सेन्सर देखील आहे. याशिवाय, हे वॉच वापरकर्त्याची स्लिप कॉलिटी देखील ट्रॅक करते. यामध्ये, तुम्हाला 11 स्पोर्ट्स मोड देखील मिळतील. यामध्ये आऊटडोअर रनिंग, ट्रेडमिल, वॉकिंग, आऊटडोअर सायकलिंग आणि स्विमिंग यांचा समावेश आहे. येथून खरेदी करा…
Amazfit चे हे नवीन वॉच 5ATM पर्यंत वॉटर रेसिस्टंट आहे. जिओ मॅग्नेटिक सेन्सर आणि ऍम्बियन्ट लाईट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या वॉचमध्ये कंपनी 188mAh ची बॅटरी देत आहे. एका चार्जवर ही बॅटरी 7 दिवस आरामात टिकेल, असा कंपनीचा दावा आहे.