स्मार्ट वेअरेबल ब्रँड Amazfit ने भारतात नवीन स्मार्टवॉच Amazfit BIP 3 ची घोषणा केली आहे. 14 दिवसांची बॅटरी लाइफ, 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड, स्लिम डिझाइन, ऍडव्हान्स हेल्थ फीचर्स आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंग यासारखी वैशिष्ट्ये स्मार्टवॉचमध्ये देण्यात येणार आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत…
हे सुद्धा वाचा : WhatsApp बदलले ! प्रोफाईल फोटो सर्वांना दिसणार नाही, मेसेजही आपोआप डिलीट होतील
कंपनी 27 जून रोजी हे स्मार्टवॉच लाँच करणार आहे. हे डिवाइस केवळ Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. Amazfit BIP 3 ची किंमत 3,499 रुपये असेल. मात्र, 27 जूनसाठी 2,999 रुपयांच्या विशेष किमतीत स्मार्टवॉच उपलब्ध असेल. हे स्मार्टवॉच ब्लॅक, पिंक आणि ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
स्मार्टवॉचमध्ये रेक्टॅंगुलर शेपसह 1.69-इंच लांबीचा कलर डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 240×280 पिक्सेल आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी 2.5D टेम्पर्ड ग्लास बसवले आहेत. स्मार्टवॉचचे वजन फक्त 33 ग्रॅम आहे. यामध्ये स्मार्ट नोटिफिकेशन्सची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्हाला फोन कॉल, ईमेल, मेसेज, हवामान आणि स्मार्टवॉचवरील इतर ऍप्सबद्दल अलर्ट मिळेल. यात 280mAh बॅटरी आहे, कंपनीचा दावा आहे की बॅटरी 14 दिवस चालेल.
स्मार्टवॉच तुम्हाला स्ट्रेस लेवल, मासिक पाळी, हार्ट सेन्सर आणि स्लिप मॉनिटरिंगची सुविधा देईल. हे डिवाइस वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग, फ्री ट्रेनिंग यासह 60 विविध स्पोर्ट्स मोड ऑफर करते. स्मार्टवॉचमध्ये PAI हेल्थ असेसमेंट सिस्टम देखील समाविष्ट आहे.