जबरदस्त ! 15 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Amazfit GTS 4 Mini स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत

जबरदस्त !  15 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Amazfit GTS 4 Mini स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Amazfit चे GTS 4 Mini स्मार्टवॉच जागतिक बाजारात लाँच

स्मार्टवॉच 16 जुलै रोजी भारतात लाँच होणार

स्मार्टवॉचची किंमत भारतात लॉन्चिंग डे ला 6,999 रुपये असण्याची शक्यता

तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम फीचर्स असलेले स्मार्टवॉच हवे असल्यास Amazfit ची लेटेस्ट वॉच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. कंपनीने आज जागतिक बाजारात Amazfit GTS 4 Mini स्मार्टवॉच लाँच केले आहे आणि ते 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. नव्याने लाँच केलेल्या स्मार्टवॉचमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले टेक्नॉलॉजीसह 1.65-इंच AMOLED स्क्रीन आहे. कंपनीचा दावा आहे की या स्मार्टवॉचला 15 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. 

हे सुद्धा वाचा : 150W चार्जिंग असलेला OnePlus फोन 9 हजार रुपयांत स्वस्त, मिळेल उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर 

 Amazfit GTS 4 Mini

 Amazfit GTS 4 Mini च्या अल्ट्रा-स्लिम 9.1mm वॉच बॉडीचे वजन स्ट्रॅपशिवाय फक्त 19g आहे. यामध्ये  मेटॅलीक फ्रेम आहे आणि ही एक कंफर्टेबल वॉच आहे. त्याचा मॅग्निफाइड 1.65” HD AMOLED डिस्प्ले काळजीपूर्वक कर्व  काचेपासून तयार केलेला आहे. 

इतर फीचर्समध्ये 24-तास हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगसाठी बायोट्रॅकर आणि 3 PPG समाविष्ट आहे. स्मार्टवॉच स्लीप ट्रॅकिंग, अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग आणि वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, योग आणि बरेच काही यासह 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड ऑफर करते. हे पाच सॅटेलाइट पोझिशनिंग सिस्टम, ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल ट्रॅकर, स्ट्रेस लेव्हल ट्रॅकर, वेदर अपडेट्स, स्मार्ट नोटिफिकेशन्स, स्टॉपवॉच, अलार्म क्लॉक आणि सेडेंटरी रिमाइंडर यांनाही सपोर्ट करते.

amazfit gts 4 mini

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ v5.2 आहे. स्मार्टवॉचला 5ATM रेट केले आहे, याचा अर्थ ते 50m पर्यंत पाणी-प्रतिरोधक आहे. वेअरेबलमध्ये बिल्ट-इन Amazon-Alexa व्हॉइस असिस्टंट आहे. स्मार्टवॉच 270mAh बॅटरीसह येईल, जी पूर्ण चार्ज झाल्यापासून साधारण 15 दिवसांपर्यंत आणि बॅटरी सेव्हर मोडवर 45 दिवसांपर्यंत पुरवण्याचा दावा कंपनीकडून केला जातो.

amazfit gts 4 mini

Amazfit GTS 4 Mini ची भारतात किंमत 

Amazfit चे GTS 4 Mini स्मार्टवॉच भारतात लॉन्चिंग डे ला 6,999 रुपयांना उपलब्ध होईल. मात्र, त्यानंतर त्याची किंमत 7,999 रुपये असेल. ही स्मार्टवॉच Amazon आणि Amazfit India च्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल. ही वॉच मिडनाईट ब्लॅक, मिंट ब्लू, मूनलाईट व्हाइट आणि फ्लेमिंगो पिंक कलर व्हेरियंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. Amazfit GTS 4 Mini स्मार्टवॉच आज युनायटेड स्टेट्समध्ये लॉन्च करण्यात आले आहे, जिथे त्याची किंमत $199.99 (अंदाजे रु. 16,000) आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo