Amazfit ने GTS सिरीजमधील नवीन स्मार्टवॉच Amazfit GTS 4 भारतात लाँच केले आहे. ही वॉच भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली होती. Amazfit GTS 4 ड्युअल बँड GPS सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. वॉचमध्ये AMOLED डिस्प्लेसह ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. वॉचसोबत अनेक फिटनेस आणि स्पोर्ट्स मोड देखील उपलब्ध आहेत.
हे सुद्धा वाचा : WhatsAppवर येणार अप्रतिम फीचर! युजर्सना मॅसेज पाठविल्यानंतर एडिट करता येईल
Amazfit GTS 4 स्मार्टवॉच 390×450 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.75-इंच HD AMOLED डिस्प्ले दाखवते. यामध्ये 150 हून अधिक वॉच फेसेस आहेत. वॉचमध्ये अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह ऍल्युमिनियम अलॉय बॉडी मिळते. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, स्लीप आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर यांसारखे अनेक फिटनेस मोड उपलब्ध आहेत. यासोबत ऑलवेज ऑन डिस्प्लेसाठी सपोर्ट देखील आहे.
त्याबरोबरच, यामध्ये बायोट्रॅकर 4.0 पीपीजी बायोमेट्रिक ऑप्टिकल सेन्सर मिळतो, जो 24/7 हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि स्ट्रेस लेव्हल मॉनिटरला सपोर्ट करतो. ही वॉच Zepp OS 2.0 शी कनेक्ट केले जाऊ शकते. ऍमेझॉन अलेक्सा आणि गेम्स देखील वॉचसह समर्थित आहेत. कॉलिंगसाठी वॉचमध्ये मायक्रोफोन आणि स्पीकर सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
Amazfit GTS 4 मध्ये 300mAh बॅटरी सपोर्ट आहे, जो 8 दिवसांच्या बॅकअप क्लेमसह येतो. इतर कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट करण्यात आला आहे. वॉटर रेझिस्टंटसाठी वॉच 5ATM रेटिंग आहे.
Amazfit GTS 4 स्मार्टवॉच रोझबड पिंक, इन्फिनिट ब्लॅक आणि मिस्टी व्हाइट या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टवॉचची किंमत 16,999 रुपये आहे. Amazfit GTS 4 22 सप्टेंबरपासून Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.